|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

19 ते 25 ऑगस्ट 2018

मेष

सूर्य चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धावाधाव करावी लागेल. संसारात अडचणी येतील. वाद संभवतो. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायात सावधपणे निर्णय घ्या. काम मिळवण्याचा प्रयत्न करा. कला, क्रीडा क्षेत्रात  प्रति÷ा राहील. मैत्रीत तणाव होईल. कोर्टकेसमध्ये मंगळवारपासून अडथळे कमी होतील.


वृषभ

चंद्र, बुध त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात मंगळवार, बुधवार वादाचा प्रसंग निर्माण होईल. कोर्टाच्या कामात समस्या येऊ शकते. धंद्यात काम वाढेल. थकबाकी वसूल करा. संसारात स्थिरता राहील. नोकरीतील कामावर वरि÷ खूष राहतील. कायदा मात्र पाळा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचा आळस करू नये. खोटे वागू नये.


मिथुन

चंद्र, बुध त्रिकोणयोग, सूर्य, शनि त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. वरि÷ तुम्हाला सहाय्य करतील. घरात, जवळचे नेते, सहकारी याच्या सहकार्याची जास्त अपेक्षा ठेवू नका. काडय़ा घालणारे लोक त्रस्त करतील. नोकरीत व्याप वाढेल. मानसन्मान मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. राग वाढेल. धंद्यात काम मिळेल. फायदा नीट करून घेता येईल. कोर्टाच्या कामात नम्रपणे मुद्दे मांडा.


कर्क

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. नवे काम मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे प्रस्थ वाढेल. लोकप्रियता मिळेल. योजना पूर्ण करा. मंगळवार, बुधवार किरकोळ वाद व गैरसमज होईल. घरात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टाच्या कामात जिद्द ठेवा. कायद्याचे पालन करा. विद्यार्थी वर्गाने प्रामाणिकपणे अभ्यास करावा.


सिंह

चंद्र, शुक्र लाभयोग, गुरु, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त हितशत्रू काडय़ा घालण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी विचार करावा लागेल. वरि÷ तुम्हाला जबाबदारी देतील. कठोर बोलणे ऐकावे लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. जीवनसाथी, मुले यांच्या सहाय्याने कामे होतील. कोर्टाच्या कामात निष्काळजीपणा करू नका. कलाक्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे मित्र मिळतील.


कन्या

चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, मंगळ षडा÷क योग होत आहे. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करू शकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वादाचे प्रसंग वरि÷ निर्माण करण्याची शक्मयता आहे. तुमचा प्रभाव टिकून ठेवता येईल. महत्त्वाची कामे याच सप्ताहात करा. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. स्पर्धा कठीण आहे. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाचा आळस करू नये. नम्र रहावे.


तुळ

चंद्र, बुध त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. मनाविरुद्ध काही कामे घरात करावी लागतील. धंद्यात हळूहळू वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. वरि÷ांना तुमचा आधार वाढेल. जवळचे लोक हेवादावा करतील. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ होईल. मैत्रीमध्ये मात्र दुरावा जाणवेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. प्रत्येक दिवस उपयोगी ठरेल.


वृश्चिक

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. धंद्यात कष्ट घेतल्यास फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. घरातील ताण कमी होईल. उत्साहवर्धक बातमी मिळेल. नवीन परिचय होतील. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना गति मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने पास होण्यासाठी अभ्यासाचा आळस करू नये. कोर्टाच्या कामात मदत मिळेल.


धनु

साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. रविवार, सोमवार धंद्यात अडचणी येतील. खर्च वाढेल. संतापाला आवर घालावा लागेल. कामगारांच्या बरोबर गोड बोला. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात राहून गेलेले काम करून घ्या. जास्त मेहनत घेतल्यास लोकप्रियता, प्रति÷ा वाढेल. नोकरीचा प्रयत्न आताच करा. कोर्टकेस संपवा. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. संसारात एखादी जबाबदारी पूर्ण करता येईल.


मकर

चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांना वेळ देऊ शकता. नोकरीत कामाचा व्याप थोडा वाढणार आहे. वरि÷ांशी वाद घालू नका. कलाक्रीडा क्षेत्रात विजयश्री खेचून आणण्याकरिता कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शेतीच्या कामात दिरंगाई करून चालणार नाही. शुक्रवार, शनिवार व्यवसायात आर्थिक आवक वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांशी संपर्क वाढवा. विरोधकांना प्रतिउत्तर देऊ नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा.


कुंभ

नवीन नोकरीची संधी मिळेल. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे.  नाटय़ चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या शब्दाला किंमत मिळेल. विद्यार्थी वर्गाने थोडे कष्ट घेतल्यास विजयश्री खेचून आणू शकतात. वाहन, घर, खरेदी करण्याचा विचार मनात येईल. शुक्रवार व शनिवार जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात.


मीन

या आठवडय़ात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध रहा. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रू पक्षाचे डावपेच ओळखून वागल्यास नक्की साथ मिळेल. शेतीच्या कामातील अडथळे कमी होतील. आर्थिक चणचण कमी होईल. शेअर्स,उलाढालीत फायदा संभवतो. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात यश संभवतो. मानसिक ताण कमी होईल.