|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल

मत्स्य महाविद्यालय नागपूरला जोडण्यासाठी याचिका दाखल 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यवाही, शासकीय अधिसूचना रद्द करण्याची मागणी

पदवीधरांची वैधता होणार प्रश्नास्पद

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा महाराष्ट्र सरकाचा 17 जानेवारी 2000 चा अध्यादेश रद्द करावा, महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठास संलग्न करावे या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आह़े दापोली कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मत्स्य विज्ञान संबंधी पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आह़े साधारणतः गेल्या 18 वर्षात पदवी, पदव्यूत्तर आणि डॉक्टरेट मिळवलेल्या अंदाजे 1 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य याचिकेच्या निर्णयानंतर निश्चित होणार आहे.

राज्य सरकारने स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्याविषयी 2008 मध्ये विधी मंडळात आश्वासन दिले. त्यानंतर राज्यात पशु, मत्स्य विद्यापीठाची निर्मिती झाली. त्याचे केंद्र नागपूर ठरवण्यात आले. या विद्यापीठाची निर्मिती करताना राज्यात मत्स्य अभ्यासक्रमांना प्रमाणपत्र देणारी एकमेव संस्था अशी तरतूद कायद्यात करण्यात आली. यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठ, पशु, मत्स्य अभ्यासक्रमांच्या विविध अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देण्यास सक्षम होते.

पशु, मत्स्य विद्यापीठ स्वतंत्रपणे स्थापन होत असताना यापूर्वीच्या कृषी विद्यापीठांच्या मत्स्य व पशु अभ्यासक्रम सुरु ठेवण्याची कायदेशीर तरतूद निरसित करण्यात आली. नेमक्या याच बाबीचा विचार करुन कोकण कृषी विद्यापीठाने 2008 साली कृषी मंत्रालयाला एक पत्र लिहिले. या पत्रात नमूद करण्यात आले की, पशु, मत्स्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रम चालवण्याच्या अधिकारांच्या सोबत कोकण कृषी विद्यापीठाचे पूर्वीचे अधिकार कायम ठेवावेत. कृषी मंत्रालयाने याबाबत अनुकुलता दर्शवली. तथापि पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने मात्र त्यासाठी अनुकुल भूमिका घेतली नाही. बाबूशाहीमुळे कोकण कृषी विद्यापीठाची कायदेशीर तरतुदीची मागणी अद्याप प्रलंबित राहिली आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले.

कायदेशीर तरतुदींचा विचार करुन नागपूरच्या पशु, मत्स्य विद्यापीठ समर्थकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि शिरगाव-रत्नागिरीचे मत्स्य महाविद्यालय आणि अन्य 8 संशोधन केंद्रे नागपूर विद्यापीठाला प्रशासकीय रितीने जोडण्यासाठी मागणी केली. राजकीय पातळीवर ही मागणी मंजुर होणे अवघड वाटल्याने विदर्भ समर्थकांनी न्यायालयाचा मार्ग अनुसरला आहे.

दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 17 नोव्हेंबर 2000 रोजी एक अधिसूचना काढली होती. त्याद्वारे कोकण कृषी विद्यापीठात सुरु असलेले मत्स्य महाविद्यालय आणि त्यातील अभ्यासक्रम स्वतंत्रपणे सुरु राहतील असे म्हटले होते. याचिकाकर्त्यांनी असे म्हटले आहे की, पशु, मत्स्य विद्यापीठ कायद्याशी ही अधिसूचना विसंगत असल्याने ती रद्द ठरवावी. अशी अधिसूचना रद्द झाल्यास 100 हून अधिक विद्यार्थ्यांची पदवी मान्यता अडचणीत सापडू शकते.

यासाठी आता तरी प्रश्नाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र विधानसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठीत करणे आवश्यक झाले आह़े परंतु त्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील एकूण मत्स्य उत्पादनापैकी 72 टक्के म्हणजेच 4.4 लाख म़े टन उत्पादन 720 क़ि म़ी लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होत़े

महाराष्ट्र शासनाने पशुविज्ञान मत्स्य विद्यापीठ कायद्यात आवश्यक ते बदल करून दापोलीचे कृषी विद्यापीठ मत्स्यविज्ञान विषयातील पदवी-पदवीका देण्यास सक्षम आहे अशी भूमिका घेणे अभिप्रेत होत़े महाराष्ट्र सरकारतर्फे ड़ॉ मुणगेकर समिती नेमण्यात आली व समिती निर्णय देईल त्या ठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठीत करण्यात येईल असे निःसंदिग्ध आश्वासन देण्यात आल़े परंतु त्या मुगणेकर समितीचा अहवा धूळ खात पडला आह़े

कोकणातील नद्या, खाडय़ा, समुद्र व 70 खाडय़ांच्या भोवती असलेले 14445 हे खाजणक्षेत्र मत्स्यशेतीला उपलब्ध असल्याने कोकणातील विद्यार्थ्यांना फिशरीज इंजिनिअरींगचे पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आह़े ऍक्वाकल्चर संबंधीचे प्राथमिक स्तरावरील तांत्रिक शिक्षण केंद्र सरकारच्या समुद्र उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत पनवेल येथे दिले जात़े वस्तुतः फिशरीज इंजिनिअरींगचे सर्व प्रकारचे पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण कोकणात उपलब्ध झाले पाहिज़े विशेषकरून मत्स्य उपलब्धी व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण, मत्स्य काढणीपश्चात तंत्रज्ञान, मत्स्यसंवर्धन, मत्स्य जलशास्त्र, मत्स्यसंपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्य शिक्षण विस्तार आदी अभ्यासक्रमांचा अंतर्भाव झाला पाहिज़े अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.

स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ हवेच ः ऍड. पाटणे 

कोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ झालेच पाहिजे अशी मागणी आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभिर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षण संस्थांच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले ऍड. विलास पाटणे यांनी केली आहे.

 

 

 

 

Related posts: