|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार

विश्वकर्मा सोशल वेल्फेअरतर्फे जिल्हय़ातील पंचांचा सत्कार 

वार्ताहर / वेंगुर्ले:

विश्वकर्मा सोशल वेल्फेअर फाऊंडेशन ट्रस्ट पुणे व विश्वकर्मावंशीय समाज संघटनतर्फे अंकुशराव लांडगे नाटय़गृह, भोसरी-पुणे येथे आयोजित केलेल्या ‘समाजभूषण सन्मान’ सोहळय़ात महाराष्ट्रातील सातजणांचा समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात जिल्हय़ातील आंतरराष्ट्रीय शिल्पकार बाळकृष्ण उर्फ दाजी वसंत पांचाळ (मालवण), शूटिंगबॉल पंच अशोक गणेश दाभोलकर (वेंगुर्ले) यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, भाजपचे प्रदेश सचिव मनोज पांगरकर, कॉमर्स विद्यापीठाचे डिन सुरेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सौ. अरुणा देशमुख-कासिद (बुलढाणा), अजित कासिद यांच्या प्रमुख उपस्थितीत शिल्पकार बाळकृष्ण उर्फ दाजी वसंत पांचाळ (मालवण), शूटिंगबॉल पंच अशोक गणेश दाभोलकर (वेंगुर्ले), सुनिता दयानंद केदार (वाई-सातारा), सौ. शुभांगी अविनाश मेस्त्राr (डोंबिवली-ठाणे), रघुनाथ हरिभाऊ खंडाळकर (भोर-पुणे), यशवंत मारुती सुतार (राधानगरी-कोल्हापूर), उमेश मारुती सुतार (विटावा- ठाणे) यांचा ‘समाजभूषण पुरस्कार- 2018’ ने गौरव करण्यात आला.