|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेता हार्दिक पटेल यांना अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह अन्य पाटीदार नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी एक दिवसाचे उपोषण आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच पटेल आणि त्यांच्या सहकाऱयांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मागील अनेक दिवस या आंदोलनाला राज्य सरकार परवानगी देत नसल्याने हार्दिक यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. हार्दिक यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते लिहितात की, ‘एकदिवसीय उपोषणाला रोखण्यासाठी आमच्या 130 हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे आणि माझ्या निवासस्थानी 58 आंदोलनकर्त्यांना नजरकैद केले आहे. 200 हून अधिक पोलीस माझ्या घराच्या चारी बाजूंना तैनात आहेत. भाजप उपोषण आंदोलनाला इतके का घाबरत आहे.’ यापूर्वीही पटेल यांनी या आंदोलनाला परवानगी न दिल्याने सरकारवर टीका केली होती. संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, पण गुजरात सरकार तो नाकारत आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.

Related posts: