|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अटलजींचा संघ प्रवेश आणि प्रवास

अटलजींचा संघ प्रवेश आणि प्रवास 

‘मी संघाच्या संपर्कात आलो व दीर्घकाळ संघ-संघटनेत राहिलो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला रा. स्व. संघ मनापासून भावला. मला संघ तत्त्वज्ञान तर आवडतेच, पण त्याहून अधिक अशी मला आवडणारी बाब म्हणजे संघाची परस्परांच्या संदर्भातील व एकमेकांबद्दल जोपासली जाणारी धारणा’ हे शब्द आहेत दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रा. स्व. संघाच्या संदर्भात लिहिलेल्या ‘आरएसएस इज माय सोल’ या विशेष लेखातील. साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’ मधील लेखामध्ये अटलजींनी संघाशी असणारे त्यांचे संबंध-संस्कार यावर विस्तृत व स्पष्ट शब्दात विवेचन केले आहे.  स्वतः अटलजींच्याच शब्दात सांगायचे झाल्यास त्यांचा संघाशी सर्वप्रथम संपर्क आला तो 1939 मध्ये. त्यावेळी अटलजी आर्य समाजांतर्गत बालसंघटन आर्य समाज सभा, ग्वाल्हेरशी संबंधित होते. ग्वाल्हेरच्या आर्यकुमार सभेचे ग्वाल्हेर येथील प्रमुख कार्यकर्ते भूदेव शास्त्राr यांनी फक्त एक दिवस आर्य समाजाच्या साप्ताहिक सत्संगाशिवाय संध्याकाळी रोजच्या शाखेत जाण्यास प्रोत्साहित केले व त्यातूनच बाल अटलजी संघ शाखेत दाखल झाले. अटलजी ग्वाल्हेरला ज्या शाखेत जात त्या शाखेतील बहुतांश बाल-स्वयंसेवक मराठीत बोलत असत. अटलजींना शाखेतील रोजचे खेळ व सामूहिक बौद्धिक विशेष आवडत असे. 10 वीत असतानाच ‘हिंदु तन मन-हिंदु जीवन, रग रग हिंदु-मेरा परिचय’ ही चिरस्मरणीय रचना लिहिणाऱया अटलजींनी संघदृष्टय़ा 1941 मध्ये संघ शिक्षा वर्गाचे (त्यावेळचे अधिकारी शिक्षण वर्ग) प्रथम वर्ष, 1942 मध्ये द्वितीय वर्ष व 1944 मध्ये बीएच्या अंतिम वर्षात असतानाच तृतिय वर्ष पूर्ण केले. त्यापूर्वी 1940 मध्ये त्यांना संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांना पाहण्याचे भाग्य लाभले होते.

 पदवीपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेर येथे पूर्ण केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी डीएव्ही महाविद्यालय कानपूर येथे प्रवेश घेतला. त्यानंतर 1946 मध्ये त्यांनी संघप्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी महाविद्यालयीन जीवनात शाखा स्तरावर काम करणाऱया अटलबिहारींना 1942 मध्ये ‘चले जाव’ आंदोलन काळात कारावासपण झाला होता. अटलजींनी नमूद केल्यानुसार त्यांच्या वडिलांचा कधी संघाशी संबंध आला नव्हता. मात्र त्यांचे वडील बंधू मात्र शाखेत जात असत.

समाज संघटनेच्या संदर्भात संघाच्या कामाचे वर्णन करताना संघाच्या माध्यमातून साधलेल्या संघटनेचे महत्त्व जाणून म. गांधीनी संघ स्वंयसेवकांनी आपले व्यवहार- संस्कारांद्वारे अस्पृश्यतेचे संपूर्ण उच्चाटन केल्याबद्दल संघ आणि संघ संस्थापकांचे कौतुक केले हेते, ते अटलजींच्या मते विशेष महत्त्वपूर्ण ठरले होते. कारण त्यावेळी अस्पृश्यता या विषयावर वारंवार होणारी चर्चा व उल्लेख यामुळेच समाजातील घटकांमध्ये वेगळेपणाची भावना प्रसारित होत होती.

अटलजींनी नमूद केल्यानुसार संघासमोर दुहेरी स्वरुपाचे आव्हानपर काम आहे. एक म्हणजे हिंदुंचे संघटन करून सशक्त हिंदु समाजाचे निर्माण करणे व हे करण्यासाठी सर्व मतभेदांवर मात करणे. हिंदु समाजात काही मतभेद अवश्य आहेत. उदाहरणार्थ हिंदुस्थानमध्ये विविध प्रदेश-भाषा प्रचलित आहेत व त्या विविधतेमध्येच आमच्या एकतेचे जे सूत्र आहे त्याची जपणूक संघाने केली आहे. त्याचवेळी देशातील ख्रिस्ती-मुसलमानाना राष्ट्र जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संघाला करायचे आहे. त्यांना विश्वास होता की हिंदू संघटन म्हणून संघाला हे सहज शक्मय होणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदुस्थानमध्ये प्राचीन काळापासून प्रचलित पूजा-प्रथांनुसार प्राणी, वृक्ष, नद्या, पर्वत इ. ची पूजा करण्याची प्रथा असल्यानेच इतर धर्मीयांच्या धार्मिक श्रद्धांची जपणूक आम्हाला सहज शक्मय हेणार आहे. मात्र त्याचवेळी इतर धर्मियांना सल्ला वजा शिकवणूक देताना अटलजीनी स्पष्ट केले होते की त्यांनी पण भारताला आपली मातृभूमी मानले पाहिजे.

भारतातील विभिन्न धर्मियांच्या संदर्भात विचार आणि आचार या संदर्भात काँग्रेसने मुसलमानांशी संबंधित समस्या मुळातून समजून घेऊन त्यानुरुप कधीच धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत असे स्पष्टपणे नमूद करताना वाजपेयींनी काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या नीतीवर कोरडे ओढतानाच देशांतर्गत मुस्लिमांचा विचार करताना त्रिविध विचारांची जी मांडणी केली होती. हा मुद्दा सदोदित चिंतनीय राहिला.

आपल्या आणि संघाशी असणाऱया प्रदीर्घ संबंधाची सुस्पष्ट शब्दात चर्चा करताना संघ स्वयंसेवकांचा परस्पर असणारा स्नेहपूर्ण संपर्क आणि व्यवहार याचा अटलजींनी जो उल्लेख केला तो याप्रमाणे…. त्यावेळी अटलजी लखनौ येथे होते. लखनौसह उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-आंदोलन विशेष जोरात होते. अचानक एका जे÷ समाजवादी पुढाऱयाची तब्येत बिघडली, पण त्याची व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पक्ष-सहकाऱयांपैकी कुणीच गेले नाही. ते पाहता वयोवृद्ध समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव सहजगत्या उद्गारले की ही कसली समाजवाद्यांमधील बंधुता, रा. स्व. संघात असे कधीही होत नाही. एक स्वयंसेवक जरी शाखेत गेला नाही तर त्याची विचारपूस अनेकजण मोठय़ा आत्मीयतेने करतात. यावर अटलजींची स्वाभाविक व सटिक प्रतिक्रिया म्हणजे ‘मूलतः रा. स्व. संघाचे काम मनुष्य निर्माण असून ही प्रक्रिया समाजाच्या सर्वच स्तरांवर नेण्याचे असून राष्ट्र आणि समाजजीवनात अनेक बदल आणि बदलाव आले तरी संघ आणि संघटनेतील संस्कारक्षम मनुष्य निर्माण प्रक्रिया अखंड सुरूच राहणार असून तेच संघाचे खरे काम आहे’

 अटलजींनी संघ स्वयंसेवक म्हणून आपल्या बाल्यावस्थेपासून जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपले स्वयंसेवकत्त्व जपले व वेळोवेळी त्याचा प्रसंगानुरुप पुनरुच्चार केला. याला त्यांनी ध्येयनि÷sची जोड दिली व म्हणून मुद्दा स्वयंसेवक वा पंतप्रधान म्हणून काम करण्याचा असो, प्रचारक वा पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचा अथवा राजकारण-प्रशासनाचा, अटलजींनी आपले संघ-संबंध सदा जपले. प्रसंगी कथित ‘दुहेरी नि÷s’चा प्रश्न आला त्यावेळी सुद्धा त्यांनी कर्तव्यनि÷sने संघनि÷ा स्पष्ट केली व त्याची नव्याने व नव्या संदर्भासह आयुष्यभर जपणूक केली हे त्यांचे वैशिष्टय़ सदा प्रेरणादायी ठरणारे आहे.

दत्तात्रय आंबुलकर