|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सूर्यास्त

सूर्यास्त 

सर्वपक्षीय नेत्यांना आणि लोकांना देखील ज्याच्याबद्दल आदर आणि आपुलकी वाटते असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गेल्या आठवडय़ात काळाच्या पडद्याआड गेले आहे. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान एवढीच अटलजींची ओळख नव्हती. तर राजकारणात असूनही सर्व पक्षातील लोकांचे प्रेम आणि आदर त्यांनी मिळवला. राजकारणातील अपरिहार्यता म्हणून विरोधकांवर त्यांनी टीका केली तरी कोणावर वैयक्तिक हल्ला किंवा कंबरेखाली वार केला नाही.

उमदेपणा हा अटलजींचा मोठा गुण होता आणि त्याने पं. नेहरूंना भुरळ घातली होती. 1957 साली अटलजी निवडणुकीत उभे असताना नेहरूंनी त्यांच्या विरुद्ध सभा घेतली नाही. उलट शेजारच्या मतदारसंघात बोलताना नेहरू म्हणाले, जनसंघ में कुछ अच्छे लोग हैं, उन्हे चुनकर आना जरुरी है  अटलजींनी आपल्या ‘डिसीसिव्ह डेज’ या आत्मकथनात याचा प्रांजळ उल्लेख केला आहे. याउलट लातूर येथे शिवराज पाटील काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत होते. लातूरमधल्या भाषणात अटलजींनी पक्षभेद विसरून पाटील यांचे कौतुक केले होते.  

1977 साली जनता पक्षाचे सरकार आल्यावर परराष्ट्रमंत्री असताना अटलजींच्या कार्यालयात लावलेले नेहरूंचे छायाचित्र काही उत्साहमूर्तींनी हटवले तेव्हा अटलजींनी ते छायाचित्र पुन्हा तिथे लावले. राजेश पायलट यांचे निधन झाले तेव्हा विदेश दौरा रद्द करून ते पायलट यांच्या घरी थांबले होते. संयुक्त राष्ट्रसंघात किंवा अन्य विदेशी दौऱयात त्यांनी सतत भारताची बाजू प्रखरतेने मांडली आणि विदेशात असताना कोणत्याही प्रसंगी पक्षीय राजकारणावर बोलणे किंवा विरोधकांवर टीका करणे आवर्जून टाळले. नेहरूंचे निधन झाले तेव्हा संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी म्हटले होते, घ्ह झ्aह्ग्tरग्’s त्ग्ाि, wा gाt a gत्ग्स्ज्sा द tप हदंत sाहूग्सहे tद ंा दिल्ह् ग्ह tप saga द न्न्aत्स्ग्क्ग्. त्ग्व Raस्, ऱाप्rल् was tप दम्पूद द tप ग्स्ज्देग्ंत aह् ग्हम्दहमग्न्aंत.

राम-रावण युद्ध संपले तेव्हा रामाने रावणाच्या देहावर यथोचित अग्निसंस्कार करविले होते आणि मृत्यूनंतर वैर संपुष्टात येते अशी शिकवण दिली होती. आपल्या संस्कृतीच्या अनेक व्यवच्छेदक लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. अटलजींनी त्यांच्या हयातीत या संस्कृतीची पाठराखण केली. त्यांच्या पश्चात ती पुढे चालू ठेवणे हीच अटलजींना श्रद्धांजली ठरावी.