|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काशिनाथ बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज, समृद्धी, गार्गीला यश

काशिनाथ बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज, समृद्धी, गार्गीला यश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

(कै.) काशीनाथ मंगल मेमोरियल जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या 15 वर्षाखालील गटात श्रीराज भोसलेने तर 13 वर्षाखालील गटात समृद्धी कुलकर्णी हिने पहिला क्रमांक मिळवला. तसेच 9 वर्षाखालील गटात गार्गी मंगल हिने पहिला क्रमांक पटकावला. कळंबा कारागृहाजवळील चव्हाण कॉलनीतील पुष्पलता मंगल नॅशनल ऍपॅडमीमध्ये स्पर्धा झाली.

प्रियदर्शनी स्पोर्टस् फाऊंडेशनसंचलित पुष्पलता ऍपॅडमीने स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 9, 13 व 15 वर्षाखालील मुला-मुलींना एकत्रीतपणे खेळविण्यात आले होते. यापैकी 15 वर्षाखालील गटात सारंग पाटील याने, 13 वर्षाखालील गटात आदित्य सावळकर याने दुसरा आणि स्वरुप साळवी याने 9 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक मिळविला. बक्षीस समारंभात सर्व यशस्वी बुद्धिबळपटूंना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. प्रियदर्शनी स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पुष्पलता मंगल याच्या हस्ते बुद्धिबळपटूंना बक्षीस देण्यात आली. यावेळी ऍपॅडमीचे बाबासाहेब मंगल, ऍमॅच्युअर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे प्रदीप अष्टेकर, कृष्णात पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह रचिता काटे, गौरी चोरगे आदी उपस्थित होत्या.

Related posts: