|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सरकार निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवा

सरकार निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकार मात्र गेल्या चार वर्षापासून लिंगायत समाजाला  स्वतंत्र धर्माचे गाजर दाखवत आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार निर्णायक भूमिका घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे, असा सल्ला लिंगायत बांधवांना आमदार सतेज पाटील यांनी दिला.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी, लिंगायत धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी गुरूवारपासून लिंगायत बांधवांचे दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. या आंदोलनाला जिल्हयातील गावा गावातून पाठिंबा मिळत असून विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देत आहेत. गुरूवारी हातकणंगले तालूक्यातील माणगाव, शिरोळ तालूक्यातील अब्दूललाट, साने गुरूजी वसाहत परीसरातील नागरीकांनी पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात  सहभाग नोंदवला. लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला.

आमदार पाटील म्हणाले, विधान परीषदेत लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात  मुद्दा उपस्थित केला आहे. सत्ताधाऱयांनी लिंगायत समाजाबाबत आपल्या जाहीरनाम्यात दिलेला एकही  शब्द पाळला नाही. या सरकारला आंदोलनाची सवय झाली आहे. चार दिवसानंतर आंदोलक शांत होतात, हे त्यांना माहित झाले आहे. त्यामुळे आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित न करता सुरू ठेवले पाहिजे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्मासाठी परवानगी द्यावी, यासाठी राज्यपालांना भेटलो आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समजांना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. लिंगायत समाज शांत आणि नम्र आहे. मात्र आता शांत बसून चालणार नाही. आक्रमक होण्याची गरज आहे. प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांच्याशी या विषयावर बोललो आहे. त्यांनी प्रदेश कॉंग्रेसतर्फे आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी लिंगायत समाजाच्या ठिय्या आंदोलनाला भेट देवून पाठींबा दिला. महाडिक म्हणाले, लिंगायात समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याचे आश्वासन निवडणूक काळात भाजप सरकारने दिले होते. मात्र पूर्ण न केल्याने समाजात रोष आहे. याबाबत लोकसभेत मी आवाज उठवला. लिंगायत समाजातर्फे वर्षभरापूर्वीही मोठे आंदोलन केले होते. मात्र तरही या बाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. लोकसभेत येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून,  लिंगायत समाजाच्या खासदारांबरोबर या प्रश्नाचा पाठपूरावा करेन. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पुरावे देण्याची आपण व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: