|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जुन्या महात्मा फुले रोडची तातडीने दुरुस्ती करा

जुन्या महात्मा फुले रोडची तातडीने दुरुस्ती करा 

प्रतिनिधी/ बेळगाव

अमृत योजनेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत जुना महात्मा फुले रोड या ठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्यात येणार आहेत. या कामास विलंब होत असल्याने रस्त्याचे डांबरीकरण रखडले होते. परिणामी जुन्या महात्मा फुले रोडवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आता वाहनधारकांना ये-जा करणे मुष्किल बनले आहे.

शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. काही रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी महापालिकेच्या अनुदानांतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही कामे अमृत योजनेंतर्गत घालण्यात येत असलेल्या डेनेज वाहिन्यांमुळे रखडली होती. सध्या या रस्त्यांची चाळण झाली आहे. गोवावेस ते दत्त मंदिर पर्यंतच्या जुन्या महात्मा फुले रोडवर डेनेज वाहिन्या घालण्याच्या कामाला मंजुरी मिळविण्यात आली आहे. याकरिता डेनेज वाहिन्या आणून ठेवण्यात आल्या आहेत. पण सदर काम मार्च महिन्यापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी सूचना नगरसेवकांनी अधिकाऱयांना केली होती. पण अमृत योजनेच्या अभियंत्यांनी व महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे डेनेज वाहिन्या घालण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत आहे. वाहनधारकांना खड्डे असल्याचे लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्याशेजारी विविध व्यवसाय असल्याने दुचाकी, चार चाकीसह अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. पण हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनधारकांना खबरदारी घेऊन रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. या परिसरात घालण्यासाठी आणलेल्या डेनेज वाहिन्या तशाच पडून असून या ठिकाणी कचऱयाचे ढीग साचले आहेत. या डेनेज वाहिन्या घालण्याचे काम कधी करणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महापालिकेच्या अनुदानांतर्गत निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर रस्त्याच्या डांबरीकरणाची  वर्क ऑर्डर कंत्राटदाराला देण्यात आली आहे. पण डेनेज वाहिन्या घालण्यात आल्या नसल्याने डांबरीकरणाचे काम मे महिन्यापासून रखडले आहे. आता पावसाचा जोर वाढल्याने डांबरीकरण करणे शक्मय नाही. पण रस्त्याची दुरवस्था पाहता खड्डे बुजविण्याची उपाययोजना आखणे गरजेचे आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णतः कानाडोळा केला आहे. यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या डागडुजीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Related posts: