|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचा हा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेच फेटाळून लावला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पत्रातून मोदींनी इम्रान खान यांचे अभिनंदन केले, तसेच दोन देशांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असे पत्रात नमूद असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Related posts: