|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत किणी हायस्कूल अजिंक्य

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत किणी हायस्कूल अजिंक्य 

वार्ताहर/ घुणकी

वाठार (ता.हातकणंगले) येथील स्वामी विवेकानंद ऍकॅडमी च्या मैदानावर सुरू असलेल्या हातकणंगले तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील किणी हायस्कूल किणीच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने फुटबॉलच्या अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंद ऍकॅडमी वाठारच्या संघावर मात करून हातकणंगले तालुक्यात  प्रथम क्रमांक पटकावला.

या सामन्यात उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल सानिका पोवार हिला सामनावीर म्हणून तर नेहा गुरव हिला  बेस्ट प्लेयर म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या संघात वैष्णवी चाळके, सानिका पोवार, सायली पाटील, श्रेया पाटील, नेहा गुरव, अवंतिका गुरव, स्वाती चव्हाण ,कशिश मुजावर, सानिका चौगुले, श्रावणी माळी, सुप्रिया चौगुले, सायली वडर, गायत्री शिर्के, गायत्री लाटवडे, अनुजा कुलकर्णी ,समृद्धी हवालदार यांचा सहभाग होता . विजेत्या संघास क्रीडा शिक्षक एस .के.धनवडे, पी .एन. पाटील, फुटबॉल कोच श्रीकांत आरेकर, यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापिका एस .बी. शिरोटे, पर्यवेक्षक डी.एच. पाटील, किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील ,उपाध्यक्ष सुहास माने, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.