|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्री विद्याधिराज सभागृहात शुक्रवारी वरमहालक्ष्मी व्रताचे आयोजन

श्री विद्याधिराज सभागृहात शुक्रवारी वरमहालक्ष्मी व्रताचे आयोजन 

प्रतिनिधी / बेळगाव

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, श्री विद्याधिराज सभागृह आणि जीवोत्तम संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने शुक्रवार दि. 24 रोजी सामूहिक वरमहालक्ष्मी व्रताचे आयोजन करण्यात आले आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील सदस्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रामनगर येथील श्री विद्याधिराज सभागृहात दि. 24 रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच महापूजेनंतर महाआरती आणि महाप्रसाद वितरण होणार आहे. मागील पाच वर्षांपासून संस्थेने या पूजन उत्सवाची परंपरा जपली आहे. समाजाचे मार्गदर्शक परमपूज्य विद्याधिराजतीर्थ स्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये महिलावर्गाने मोठय़ा संख्येने भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: