|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव -गोवा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

बेळगाव -गोवा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात 

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव-गोवा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावरून जाणाऱया वाहनांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे पाईप, विद्युत खांब, झाडे वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या मार्गासाठी गोव्याच्या अधिकाऱयांशी चर्चा करून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

बेळगाव-गोवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग निर्माण करणे महत्त्वाचे आहे. या रस्त्यावर अनेक झाडे आहेत. ती वाचविण्यासाठी सर्व्हे करावा, असे जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांना सांगितले आहे. या रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचे पाईप तसेच निर्माण करण्यात येणाऱया पुलांबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.

या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी गोव्याच्या अधिकाऱयांशी चर्चा  केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. राष्ट्रीय प्राधिकरणला याबाबतचा संपूर्ण अहवाल देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम अहवाल तयार करा आणि तो त्यांना द्या, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावरील विद्युत खांब हलविताना काळजी घेणेही गरजेचे आहे.

या बैठकीला प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर, आरटीओ शिवानंद मगदूम, शिवानंद उळेगड्डी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 

Related posts: