|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुसऱया श्रावण सोमवारीही कपिलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

दुसऱया श्रावण सोमवारीही कपिलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी 

बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरामध्ये दुसऱया श्रावण सोमवारीही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली होती. सोमवारी 20 हजार भक्तांनी दर्शन घेतल्याचे मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले.

बेळगावचे श्रद्धास्थान असलेल्या कपिलेश्वर मंदिरात सोमवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. आलेल्या भाविकांना दूध तसेच खिचडीचा प्रसाद देण्यात येत होता. भक्तांनी आणलेले दूध न ओतता ते तीर्थ म्हणून वाटण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टकडून करण्यात येत होते.

मंदिरात यावषी प्रथमच महाकाल आरास करण्यात आली होती. मंदिराचे पुजारी नागराज कट्टी यांनी ही आकर्षक आरास केली होती. त्यांना ही आरास करण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागला. या आकर्षक आराशीबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते.

Related posts: