|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आरपीआयचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आरपीआयचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

प्रतिनिधी / बेळगाव

लोकशाही प्रधान म्हणून ओळखलेल्या देशामध्ये राज्यघटना जाळून संपूर्ण देशाचा अवमान करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने तसेच समता सैनिक दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर राज्यघटना जाळण्यात आली आहे. या घटनेमुळे  देशाचा मोठा अवमान झाला आहे. राज्यघटना जाळून त्यानंतर अनुसुचित जाती, जमातीच्या जनतेबद्दल अवमानकारक वक्तव्य देखील केले आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. तेंव्हा संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि त्या देशदोह्यांना अटक करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

कन्नड साहित्य भवन येथून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन हे निवेदन देण्यात आले. यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुलेमान जमादार, रियाज मुल्ला, लक्ष्मण बच्चलपुरी, आयुब मुल्ला, हणमंत अक्षीमनी, लक्ष्मण बंबवाडकर, रेखा कोलकार, मंजुळा असोडे, गणेश सांबरे, नासीर पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: