|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » उर्दू लेखिका ‘इस्मत चुगताई’ यांना गूगलची आदरांजली

उर्दू लेखिका ‘इस्मत चुगताई’ यांना गूगलची आदरांजली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली 

गूगलने मंगळवारी सुप्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्यावर डूडल बनवलं आहे. यांचा आज 107 वा जन्मदिवस आहे. चुगताई यांना गूगल डुडलमध्ये काहीतरी लिहिताना दाखवण्यात आलं आहे.गूगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये डुडलबाबत माहिती देताना म्हटलं आहे. उर्दू फिक्शनला एका नव्या उंचीवर नेणाऱया आदरणीय इस्मत चुगताई यांचा आज 107 वां जन्म दिवस आहे.

चुगताई यांना 1942 मध्ये त्यांच्या वादग्रस्त लिखाणापैकी एक ’लिहाफ’वरून ओळख मिळाली. चुगताई यांना महिलांकडून आवाज उठवणे आणि समाजात महिलांना पुढे आणण्यासाठी ओळखण्यात येते. आपल्या लेखात त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरूवातीला, उत्तर प्रदेशातील लहान शहरातील मुलींची स्थिती, दशा आणि वंशवादावर मोकळेपणाने लिहिले आहे.

 

Related posts: