|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पुढील महिन्यात बेंगळूरूमध्ये दमदार पाऊस

पुढील महिन्यात बेंगळूरूमध्ये दमदार पाऊस 

 ऑनलाईन टीम  / बेळगाव :

यावर्षी कर्नाटकातील कोडगू, दक्षिण कन्नड भागात अतिवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच कर्नाटकाची राजधानी असणाऱया बेंगळुरू मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तितकासा पाऊस पडलेला नाही आहे. पण पुढील महिन्यात मात्र पाऊस पडणार असल्याची शक्यता कर्नाटक राज्य नैसर्गीक विपत्ती निर्वहण केंद्राने वर्तविला आहे.

मागील वर्षी या भगात 383.3 मिली मिटर इतका पाऊस पडला होता. त्यामुळे पुढील महिन्यात बेंगळूरकरांना दमदार पावसाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या वर्षी अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशी आशा येथील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

 

 

 

Related posts: