|Thursday, July 18, 2019
You are here: Home » विविधा » राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी सरकार देणार शिष्यवृत्ती

राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी सरकार देणार शिष्यवृत्ती 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

  राज्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील खुल्या तसेच  इतर मागासवर्गीय आणि विजा-भज, विमाप्र या प्रवर्गातील एकूण 20 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी यासाठी  ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना जगातील आघाडीच्या 200 विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच पहिल्या 25 विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हवामान बदल, उर्जा बचत, ऍनॅलिटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना प्राधन्य देण्यात येईल.