|Saturday, April 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याला होणारे आजार

बुध. दि. 22 ते 28 ऑगस्ट 2018

काहीजणांना जन्मताच अनेक आजार असतात. सतत काही ना काही शारीरिक त्रास होत असतात व त्यासाठी भरमसाठ पैसे खर्चावे लागतात. गेल्या जन्मात डॉक्टराकडून कर्ज घेतलेले होते का असे  म्हणण्याची पाळी येते. तर काही जण 80, 90 वर्षाचे असूनही त्यांची प्रकृती धडधाकट असते. ‘पूर्वजन्मार्जित कुकर्माणी बाध्यते आरोग्यम्’ अशी म्हण आहे. आजकाल कोणत्याही दवाखान्यात जा पेशंट भरलेले दिसतात. मनुष्यप्राणी म्हटल्यावर आजार हे असणारच. कुणाला तेव्हा कोणता आजार होईल हे सांगता येणार नाही. पण बहुतांश आजार हे माणसांनी स्वत:हून ओढवून घेतलेले आहेत, हे स्पष्ट दिसून येते. आयुर्वेदात   ज्योतिषशास्त्राच्या आधारे कुणाला कोणते आजार होऊ शकतात याचे अतिशय सुरेख विश्लेषण केलेले आहे. चरकसंहिता अथवा  निघंटु, आरोग्य रत्नाकर, शिवलीलामृत, गुरुचरित्र, कर्मविपाक वगैरे जुन्या गंथात आजाराची कारणे दिलेली आहेत. कर्मविपाक ग्रंथात तर पूर्वजन्मातील कोणत्या कर्मामुळे मनुष्यप्राण्याला कोणते आजार होतात याचे विवेचन आहे, पण काही रोग हे मानसिक विकारातून निर्माण होतात. ‘सर्व लक्षण हीनो पि या सदाचर वान्नर श्रद्ध धानो न सूर्यश्च शतं वर्षापि जिवती’ असे संस्कृत सुभाषित आहे. रुप, पैसा, अलंकार इत्यादी नसूनही  जी व्यक्ती सदाचरणी श्रद्धावान व मत्सररहीत असते, ती व्यक्ती शतायुषी होते, असा याचा अर्थ आहे. मानसिक समाधान, विश्रांती, शांती, मनाची निर्मलता या बाबी प्रार्थनेमुळे साध्य होतात. म्हणून आपल्याला आवडणारी कोणतीही प्रार्थना मंत्र स्तोत्र म्हणावी, ईर्षा, असूया व मत्सरामुळे कोणते रोग होतात, याची थोडक्मयात माहिती खाली दिलेली आहे. त्यानुसार आपली वागणूक सुधारण्याचा प्रयत्न केल्यास बरेच रोग आटोक्मयात येऊ शकतात. जे सतत दुसऱयाचा द्वेष करीत असतात, पाठीमागे टेंगलटवाळी, टोचून बोलणे, त्याना मूत्राशयासंदर्भातील विकार, एखाद्याचे चांगले झालेले पाहून पोटदुखी निर्माण होते, त्यामुळे पित्ताशय व हृदयरोग पित्तखडे, अनामिक भीती, असेच धाकदपटशा यामुळे पचनक्रिया बिघडणे, सुवर्णलंकारांची अती हाव, अती कंजूषपणा, स्वार्थी वृत्ती, आधाशीपणामुळे पुटकुळय़ा अपचन व आत्महत्या, चिंता काळजीमुळे मज्जातंतू बिघडणे, अल्झायमर तीव्र मनक्षोभामुळे सर्दी, अति संतापामुळे फिटस येणे, अति चिंतेमुळे कावीळ, एकदम मानसिक धक्का बसण्यामुळे मधुमेह यासह अनेक रोग होतात. त्यामुळे अशा रोगापासून बचाव होण्यासाठी औषधोपचाराबरोबरच सर्व रोग, द्वेष, मत्सर, लोभ यांचा त्याग करून आनंदी वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न केल्यास बरेच रोग आटोक्मयात येऊ शकतात. कोणत्या ग्रहयोगामुळे कोणते आजार निर्माण होऊ शकतात, हे ज्योतिष शास्त्राधारे समजून घेतल्यास आजारावर नियंत्रण ठेवता येणे शक्मय आहे. शनि, मंगळ युती, भांडण तंटे, अपघात, दर्शवते. पण त्याची वेळीच  कल्पना आल्यास अपघात व त्या अनुषंगाने होणारी शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकेल. इतरांचा द्वेष करण्याची भावना ठेवणे हा एक प्रकारचा मानसिक कर्क रोग आहे. क्रोध वाढल्यास रक्तात विष तयार होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. मज्जातंतू क्षीण होतात, हे लक्षात ठेवावे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पूर्वसंचिताप्रमाणे चांगले किंवा वाईट भोग भोगावे लागतात. एखादा माणूस कष्टाने प्रगती करून घेतो पण मत्सरी लोकांना त्याचे कष्ट दिसत नाहीत. व ते त्याचा द्वेष अथवा मत्सर करू लागतात. याचे प्रमाण वाढले की त्याचे रुपांतर नको त्या भयानक  रोगात होते. यासाठी आरोग्य चांगले रहावयास हवे असेल तर राग, द्वेष, मत्सर, पोटदुखी यांचा त्याग करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी वृत्तीमुळे बरेच आजार कमी होऊ शकतात. वर रोगांची कारणे व उदभवणारे रोग या विषयी जी माहिती दिलेली आहे ती फक्त एक छोटीसी झलक आहे.

मेष

दशम व लाभस्थानात होत असलेली सौभाग्य योगावरील.. नारळी पौर्णिमा अतिशय शुभ असून जे काही काम कराल, त्यात वृद्धी करणारी आहे. धार्मिक कार्य केल्यास त्याचे दुपटीने फळ मिळेल. नोकरी, व्यवसाय, मित्रमंडळींचे सहकार्य, शिक्षण, प्रवास, नावलौकिक या दृष्टीने चागंले अनुभव देईल. बिघडलेले आर्थिक संबंध सुधारण्यास अनुकूल काळ आहे.


वृषभ

भाग्य व दशमस्थानात होत असलेली राजयोगावरील गुरुवारची पौर्णिमा नोकरी व्यवसायात जबाबदारी वाढवील. या पौर्णिमेदरम्यान ज्या काही चांगल्या घटना घडतील, त्या सतत वाढत राहतील. धनलाभ  झाल्यास वारंवार तसे योग येतील. शनी, मंगळ योग भावंडांच्या बाबतीत जरा अनिष्ट आहे. कपट कारस्थानाचा त्रास जाणवेल.


मिथुन

अष्टमस्थानी राजयोगावरील नारळी पौर्णिमा होत आहे. खोल पाणी, धबधबे, समुद्र अशा  ठिकाणी नको ते धाडस करू नका. आरोग्यात सुधारणा, परदेश प्रवास, लग्नासंदर्भातील कोणत्याही वाटाघाटी प्रयत्न, बोलणी वगैरे केल्यास त्यात चांगले यश मिळेल. व्यवसाय सुरू केल्यास त्यात मनासारखी प्रगती होईल. दूर प्रवासाचे बेत यशस्वी होतील.


कर्क

सप्तमात नारळी पौर्णिमा विवाह, प्रवास, वाटाघाटी, कर्जफेड व कोर्टप्रकरणाच्याबाबतीत अनुकूल आहे. धनलाभ व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय शुभ आहे. अनेक मार्गाने धनलाभ होतील. शारीरिक, मानसिक ताणतणाव कमी होतील. त्यामुळे दैनंदिन कामकाजात सुधारणा झालेली दिसून येईल.


सिंह

नारळी पौर्णिमा काही बाबतीत संमिश्र फळ देणारी आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून  येईल. कुटुंबात नवीन व्यवहाराच्या वाटाघाटी सुरू होतील. जरा धुसफूस किरकोळ शत्रुत्व, याचाही अनुभव येईल. मंगळ, शनि अजूनही हटलेले नाहीत. अपघात व इतर कोणत्याही मोठय़ा व जोखमीच्या व्यवहारात सावधानता बाळगा, केतू, नेपच्यूनचा योग चांगला नाही. वैवाहिक बाबतीत कोणत्याही गैरसमाजाला वाव देऊ नका.


कन्या

नातेवाईक, शेजारी, आप्तस्वकिय, मुलाबाळांना चांगले फळ देण्याची शक्मयता आहे. एखादी महत्त्वाची जोखीम असलेली कामगिरी स्वीकारावी लागण्याची शक्मयता आहे. घर, जागा, अथवा वाहन जे काही या पौर्णिमेला घ्याल त्यात पुढे वाढ होत राहील. व्यसनी मित्रमंडळीबरोबर बाहेर फिरणे टाळा.


तूळ

सुखस्थानात होत असलेली राजयोगावरील नारळी पौर्णिमा बौद्धिकदृष्टय़ा अतिशय चांगली फळे देईल. घराण्याचा उत्कर्ष करणारी आहे. एखादी सुप्त इच्छा पूर्ण होईल. उत्तर दिशेकडे एखादा व्यवसाय वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न करा. चांगला चालेल. जे काही कराल त्यात पारदर्शकता व व्यावहारिक जागरुकता ठेवा.


वृश्चिक

पराक्रमात तृतीय स्थानी होणाऱया राजयोगावरील पौर्णिमेदरम्यान मानसिक  उत्साह वाढेल. अनेक मार्गाने कुबेराची कृपा होऊ शकेल. लिखाणाशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार या दिवशी केल्यास ते यशस्वी होतील. वहय़ा, पुस्तके, आरसा, तिजोरी, वस्त्रे वगैरे या पौर्णिमाकाळात खरेदी केल्यास त्या वस्तू लाभतील.


धनु

धनस्थानी होणारी नारळी पौर्णिमा अनेक बाबतीत मोठे यश मिळवून देईल. प्रति÷ा वाढणाऱया काही घटना घडतील. काही आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने ही पौर्णिमा महत्त्वाची भूमिका बजावेल. शनि, मंगळ युतीच्या योगावर वाईटातून देखील काही घटना घडू शकतील.


मकर

राजकीय, सामाजिक क्षेत्र तसेच इंजिनियरिंगशी संबंधित क्षेत्रातील क्यक्तींना ही पौर्णिमा अतिशय शुभ ठरणार आहे. इतरांना जबाबदारीत वाढ, प्रवास, नव्या क्षेत्रात  प्रवेश, नवनव्या, ओळखी व त्यातून लाभ विवाहाचे योग असे अनुभव येतील. या पौर्णिमेला कोणतेही अवघड कामे करा यशस्वी व्हाल.


कुंभ

नारळी पौर्णिमा अध्यात्मिक शक्तीची  कृपा घेऊन आलेली आहे. या पौर्णिमेला कोणतेही जपजाप तसेच गूढ विद्या शिकण्याचा प्रयत्न करा. नक्कीच चांगली प्रगती होईल. शनि, मंगळाचा अजूनही प्रभाव आहे, नवीन व्यवसाय सुरू करताना काळजी घ्या. जुन्या वस्तू खरेदी करू नका.


मीन

नारळी पौर्णिमा लाभात होत आहे. ज्या क्षेत्रात असाल त्यात चांगले यश मिळवाल, या काळात जर नवी नोकरी मिळाली अथवा बदली झाली तर ते चांगले ठरेल. पुढे जीवनाला निराळे वळण लागेल. उत्कर्षाच्या संधी घेऊन येणाऱया या पौर्णिमेला घरात लक्ष्मीस्तोत्राचे वाचन करा. सुरेख अनुभव येईल.

Related posts: