|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोपींचे निर्मत्सर मन

गोपींचे निर्मत्सर मन 

भगवंताच्या पावलांचे कुंजवनाच्या धुळीत उमटलेले ठसे अचानक पाहून गोपिकांना अत्यानंद झाला. गोपी एकामागे एक तेथे धावत गेल्या. त्यांना असे वाटले, की तेथे श्रीकृष्णच आहे. कृष्णाच्या पावलांची माती त्यांनी आपल्या कपाळाला लावली. तिथे उमटलेले ठसे न्याहाळून पाहिल्यावर, कृष्णाबरोबर कोणीतरी अन्य स्त्री आहे असे त्यांच्या ध्यानीं आले. त्या म्हणू लागल्या की, तुम्ही आम्ही सर्वजणी पापिणी आहोत, परंतु अधिक पुण्यवान असलेली ही स्त्री कृष्णाच्या सहवासात आहे. देव माझ्या स्वाधीन झाला म्हणून त्या कृष्णाबरोबर असलेल्या गोपीला अभिमान वाटत होता. ती लाडिकतेने कृष्णाला म्हणाली, मला चालवत नाही. कडेवर घेणार असलास तर बरोबर येईन. कृष्णाने तिलाही गर्व झाल्याचे मनात जाणले. तिचा गर्व नाहीसा करण्यासाठी कृष्ण तेथूनही गुप्त झाला. त्यामुळे ती गोपीही शोक करू लागली असे नामदेवराय म्हणतात.

श्रीमद्भागवतातील या कथा प्रसंगाविषयी विवेचन करताना स्वामी तेजोमयानंदजी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतात तो असा-अचानक अदृश्य झालेल्या श्रीकृष्णाचा शोध घेत असताना गोपिकांनी विचार केला जर कृष्ण कुठे गेला असेल तर त्याची चरण चिन्हेही उमटलेली असली पाहिजेत. असा विचार त्या करीतच होत्या तोच, त्यांना श्रीकृष्णाची पदचिन्हे उमटलेली दिसू लागली. त्यांचा मागोवा घेत घेत त्या जाऊ लागल्या. तेव्हा त्यांना श्रीकृष्णाच्या चरण चिन्हांबरोबरच दुसरीही चरणचिन्हे दिसू लागली. ती पाहिल्यावर गोपिका म्हणाल्या, ओ।़हो! श्रीकृष्ण एकटा गेलेला नाही तो कोणा स्त्रीला बरोबर घेऊन गेला आहे. श्रीमद्भागवतात येथे कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. (नामदेवरायही कुणाच्याही नावाचा उल्लेख येथे करत नाहीत.) पण दुसऱया पुराणांमधून म्हटले आहे की ती पदचिन्हे राधेची होती. गोपिका आपापसात म्हणू लागल्या-ही दुसरी पदचिन्हे कोणाची आहेत? सगळय़ाजणी म्हणू लागल्या, अनया।़राधितो-ही जी दुसरी स्त्री त्यांच्याबरोबर गेलेली आहे ती कोणीही असो, पण तिने भगवंतांची खूप आराधना केली असली पाहिजे. त्यांना तिच्याविषयी जराही ईर्षा किंवा हेवा, मत्सर वाटला नाही. हे विलक्षण आहे. सामान्यतः अशाप्रकारच्या संदर्भात एका स्त्रीला दुसरीविषयी कितीतरी मत्सर वाटू लागतो. येथे इतक्मया सर्व स्त्रिया भगवंतांबरोबर असताना कोणालाही गोपीविषयी ईर्षा उत्पन्न झाली नाही. ह्यावरून लक्षात येते की, श्रीकृष्ण तर सर्व भूतांतरात्मा, सर्वांचा आत्मा आहेत. ह्या सर्व गोपींनी विचार केला की, त्या गोपीने भगवंतांची खूप भक्ती केली असावी. म्हणूनच भगवान आम्हाला सोडून एकटेच तिच्याबरोबर गेले.

  खूप लोक गुरुभक्ती करतात. पण त्यांच्यामध्ये आपापसातच द्वेष असतो. एकाला वाटते, माझी गुरुंवरील भक्ती जास्त आहे. दुसऱयाची भक्ती माझ्या इतकी नाही. मीच खरी सेवा करतो. त्याचप्रमाणे, भगवंतांच्या भक्तांमध्ये असा विचार करणारे भक्त असतात की, माझीच भक्ती श्रे÷ आहे. दुसरे लोक काय भक्ती करतात? अशाप्रकारे, आपण आपल्यालाच श्रे÷ समजत राहतो.

Ad. देवदत्त परुळेकर