|Saturday, February 23, 2019
You are here: Home » उद्योग » त्रासदायक कॉलसंदर्भात दूरसंचार कंपन्यांबरोबर चर्चा

त्रासदायक कॉलसंदर्भात दूरसंचार कंपन्यांबरोबर चर्चा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

त्रासदायक कॉलपासून सुटका करण्यासाठी नवीन नियमांसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्याने दूरसंचार कंपन्यांबरोबर बैठक घेण्याची ट्रायने तयारी केली आहे. त्रासदायक व्यावसायिक कॉल आणि मेसेजची समस्या गंभीर आहे आणि ती टाळता येत नाही. अधिकाऱयांना दूरसंचार कंपन्यांबरोबर बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत नवीन नियमांसदर्भात कंपन्यांची असलेली मते विचारात घेण्यात येतील, असे ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी म्हटले.

ट्रायकडून नव्याने करण्यात आलेल्या नियमांबद्दल कंपन्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नकोशा असणाऱया कॉलपासून ग्राहकांची सुटका करण्यासाठी नवीन प्रणाली सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सीओएआयने ही प्रक्रिया वेळखावू, खर्चिक आणि कठोर असल्याचे म्हटले होते. सध्याचे नियम कंपन्यांना समजले नसल्याची शक्यता आहे. काही मुद्यांबाबत समस्या असल्यास ती सोडविण्यात येईल असे त्यांनी म्हटले.

 

Related posts: