|Thursday, April 18, 2019
You are here: Home » उद्योग » ‘ओप्पो एफ9 प्रो’ सादर

‘ओप्पो एफ9 प्रो’ सादर 

नवी दिल्ली

 ओप्पो या चिनी कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत ओप्पो एफ9 प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये व्हुक सुपरफास्ट चार्जिंग असणारी बॅटरी आहे. या नवीन तंत्रज्ञानाने केवळ 5 मिनिटांच्या चार्जमध्ये फोन 2 तास चालू शकतो. याव्यतिरिक्त नव्या प्रकारे वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आला आहे.  ओप्पो एफ9 प्रो ची किंमत 23,990 रुपये आणि ओप्पो एफ9 ची किंमत 19,990 रुपये आहे. ओप्पो एफ9 मध्ये 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि रॅम 4 जीबी आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री 31 ऑगस्टपासून सुरू होईल. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन आणि पेटीएम मॉलव्यतिरिक्त ऑफलाईन बाजारात खरेदीसाठी तीन रंगात उपलब्ध असतील.

ओप्पो एफ9ची वैशिष्टय़े :

डिस्प्ले : 6.3 इंच फुल एचडी प्लस

प्रोसेसर : मीडियाटेक हेलियो पी60

रॅम : 6 जीबी, स्टोरेज : 64 जीबी

ऑपरेटिंग प्रणाली : ऍन्ड्रॉईड 8.1

मुख्य कॅमेरा : 25 मेगापिक्सल

सेल्फी कॅमेरा : 16 व 2 मेगापिक्सल

बॅटरी : 3500 एमएएच

Related posts: