|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सुवर्ण सिंहासन तयारीसाठी आज भिडेगुरूजी चिपळुणात

सुवर्ण सिंहासन तयारीसाठी आज भिडेगुरूजी चिपळुणात 

तब्बल 14 सामाजिक संस्था विरोधात एकवटल्या, भिडेंना जिह्यात कायम बंदी करण्याची मागणी

प्रतिनिधी /चिपळूण

सुवर्ण सिंहसनाच्या तयारीसाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडेगुरूजी यांच्या उपस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बुधवारी चिपळुणात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र तब्बल 14 सामाजिक संस्थांनी एकवटत या बैठकीला कडाडून विरोध केला आहे. भिडे गुरूजींनी कायम जिल्हा बंदी करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काही महिन्यांपूर्वी भिडेगुरूजी यांच्या उपस्थितीत शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी आंबेडकरी जनेतेने शहरातून मोर्चा काढत या सभेला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे ऐनवेळी ही सभा रद्द केली होती. मात्र आता पुन्हा येथील शिवप्रतिष्ठानतर्फे या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत भिडे हे ‘32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना व खडा पहारा योजना’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. या बैठकीला तालुक्यासह जिल्हाभरातील काही कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

एकीकडे या बैठकीची तयारी जोरात सुरू असताना त्याला विरोधही तितकाच तीव्र होत आहे. येथील संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रसेवा दल, रिपब्लिकन सेना, चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती, बौध्द महासभा, बौध्दजन पंचायत समिती, मुस्लिम सिरत कमिटी, कुणबी आघाडी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यासह एकूण 14 सामाजिक संस्था याविरोधात एकवटल्या आहेत. या संस्थांच्यावतीने येथील पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. भिडेगुरुजी हे भीमा-गोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी असल्याचा आरोप करण्यात आले आहेत ते बहुजन व मराठा समाजात द्वेष पसरवण्याचे आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा ठपका या संस्थांनी ठेवला आहे. तसेच बुधवारी बकरी ईद असल्याने या बैठकीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी आरपीअयचे राजू जाधव, सुभाष जाधव, बौध्दजन हितसंरक्षक समितीचे चंद्रकांत सावंत, अशोक कदम, सुदेश गमरे, राष्ट्रपाल सावंत, सुहास पवार, महेश सकपाळ, रमाकांत सकपाळ, राजन इंदुलकर, संभाजी ब्रिगेडचे सुबोध सावंत-देसाई, दिनेश माटे, रफिक साबळे, मुजाईद मेयर, सज्जाद काद्री, संदेश मोहिते, रमन मोहिते आदी उपस्थित होते.

सभेवर बंदी नाहीः डॉ मुंढे

भिडे गुरूजींची चिपळूण येथील सभा बंदिस्त सभागृहात असल्याने त्याला पोलिसांच्या परवानगीची आवश्यकमता नाह़ी त्यामुळे विविध संघटनांकडून सभेवर बंदी घालण्याची केलेली मागणी मान्य करता येणार नाह़ी मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघणार नाही दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: