|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » किम जोंग उन यांना पुन्हा भेटणार ट्रम्प

किम जोंग उन यांना पुन्हा भेटणार ट्रम्प 

उत्तर कोरियाच्या वर्तनात सुधारणा नाही

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

 उत्तर कोरियाने अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न रोखल्याचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नसल्याचे विधान संयुक्त राष्ट्राच्या न्युक्लियर वॉचडॉगने केले आहे. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेने (आयएईए) एका अहवालात उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम सुरूच राहणे अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे नमूद केले. तर या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियासोबत झालेली चर्चा यशस्वी ठरवून किम जोंग उन यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे संकेत देत आहेत.

आयएईएचा अहवाल उत्तर कोरियासोबत ट्रम्प यांच्या दाव्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. 12 जून रोजी सिंगापूरमध्ये ट्रम्प आणि किम यांच्यात ऐतिहासिक चर्चा पार पडली होती. उत्तर कोरियाने पूर्णपणे आण्विक निशस्त्राrकरणाचे वचन दिल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. उत्तर कोरिया स्वतःचे वचन पूर्ण करत नसल्याचा दावा करणारे अनेक अहवाल मागील काही महिन्यांमध्ये समोर आले आहेत.

किम यांच्या हेतूबद्दल कितीही संशय व्यक्त होत असला तरीही आण्विक निशस्त्राrकरणासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. उत्तर कोरियाच्या आण्विक चाचण्या रोखल्याचा दावाही ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केला. किम यांची पुन्हा भेट होण्याची मोठी शक्यता असली तरीही मी यावर विधान करू इच्छित नसल्याचे ट्रम्प म्हणाले.

परंतु संयुक्त राष्ट्राची संस्था असणाऱया आयएईएचा नवा अहवाल ट्रम्प यांच्या अडचणी वाढविणारा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांनी अमेरिकेवर टीका केली होती. शत्रुत्वपूर्ण शक्ती आमची कोंडी करून उत्तर कोरियाच्या जनतेला उद्ध्वस्त करू पाहत आहेत, असे किम यांनी म्हटले होते. अमेरिकेने अद्याप उत्तर कोरियावरील स्वतःचे निर्बंध मागे घेतलेले नाहीत.