|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » युध्द काळात देशाचा विजय हे एकच ध्येय असते

युध्द काळात देशाचा विजय हे एकच ध्येय असते 

वार्ताहर/ रूकडी

युध्द काळात देशाचा विजय हे एकच ध्येय सैनिकांच्या पुढे असते, बर्फात राहताना, वाळवंटातून फिरताना शरीराचाही विसर पडतो. देशाचे रक्षणापुढे कुटूंबाचीही आठवण येत नाही. असे प्रतिपादन कारगिल युध्द प्रत्यी सहभागी झालेले निवृत्त सैनिक माणिक सावंत यांनी केले. ते रूकडी येथील काकासाहेब माने हायस्कूल आयोजित केलेल्या सैनिकांचे विद्यार्थ्यांची हितगुज या उपक्रमात बोलत होते.

तरूणांना भारतीय सैन्य दलात सेवाच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ध्येय समोर ठेवून जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास सैन्य दलातही चांगल्या पदावर सेवा करण्याची संधी मिळेल. त्यासाठी विद्यार्थी दशेपासून शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ फिट असणे आवश्यक आहे. असे सावंत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन करताना सांगितले. यावेळी त्यांनी कारगिल युध्दातील कांही प्रसंगाविषयी मुलांना सांगितले.

यावेळी शिवम चव्हाण, श्रेयस मलगौंडी, उदय बनकर, अजिंक्य गायकवाड, साद नदाफ या विद्यार्थ्यांनी या माजी सैनिकाची मुलाखत घेतली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक नरसुडे, श्रीमती सुवर्णा पाटील, डॉ.सदाशिव भोसले आदी मान्यवर उपास्थित होते.  अध्यापक संजय वाकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजय शिणगारे यांनी आभार मानले.