|Friday, July 19, 2019
You are here: Home » विविधा » अंबानींची केरळ पूरग्रस्तांसाठी 21 कोटींची मदत

अंबानींची केरळ पूरग्रस्तांसाठी 21 कोटींची मदत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापुराने उद्धवस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताच्या कानाकोपऱयातून केरळला मदत पाठवली जात आहे. देशातील बडे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशन तब्बल 51 कोटी रुपयांचे आवश्यक साहित्य पाठवणार आहे.

 

रिलायन्सने देऊ केलेली ही मदत, अनेक राज्यांनी दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचेच बोलायचे झाले, तर फडणवीस सरकारने केरळसाठी 20 कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्राची ही मदत अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. आता रिलायन्सने त्यापेक्षा जास्त दिली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी केरळमधील जनतेप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. “केरळचे नागरिक कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन आवश्यक ती सर्व मदत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची मदत देत आहोत असे नीता अंबानी यांनी सांगितले.