|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोरेगाव आगारप्रमुखांना आंदोलनाचा इशारा

कोरेगाव आगारप्रमुखांना आंदोलनाचा इशारा 

प्रतिनिधी /सातारा :

विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागला. परंतु आजही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रामीण भागात उच्च्ला दर्जाचे शिक्षण उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने शहरी भागाकडे शिक्षणासाठी वळावे लागत आहे. त्यासाठी त्यांना एसटी महामंडळाचे नेहमीच सहकार्य लाभते. परंतु अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

  कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव, भंडारमाची या पसिरातील विद्यार्थी हे विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोरेगाव, सातारा येथे येत असतात. परंतु वेळेत बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठय़ा प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेवर सुरु करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा युवा मोर्चा कोरेगाव तालुक्याच्यावतीने  निवेदनाद्वारे कोरेगाव आगारप्रमुखांना दिला आहे.

  आगारप्रमुखांना निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश यादव, नितीन मोरे, सोमनाथ गुरव, संकेत जाधव, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, विद्यार्थ्यांसाठी चिमणगाव येथे सुरु असलेली बस वेळापत्रकाप्रमाणे येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरेगाव व सातारा येथे महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होतो. तरी ही बस वेळेवर सुरु करण्यात यावी, सिद्धार्थनगरची 8.30 व 10 ला येणाऱया बसेस फुल्ल येतात. त्या बसेस आमच्यासाठी थांबत नाहीत. सातारा चिमणगाव ही सकाळी येणारी बस ही भांडारमाची-सातारा अशा पद्धतीने विस्तारित करण्यात यावी, तसेच भंडारमाची बस ही 4.30 ला यावा.r चिमणगाव सातारा येणारी बस ही संध्याकाळी 6 वाजता बस येत नाही. अन्यथा भाजपा युवा मोर्चा कोरेगाव तालुक्यातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

   चिमणगाव व परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एसटी बसच्या गैरसोयीबाबत एसटी आगार प्रमुख यांना भाजपा युवा मोर्चाच्या सहकार्याने निवेदन दिले. एसटी आगार प्रमुख यांनी तातडीने ही मागणी मान्य केली व भंडारमाची सातारा बस चालू करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.