|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » एबीआयटीतून नेहमीच उच्चतम दर्जाचे अभियंते घडतील

एबीआयटीतून नेहमीच उच्चतम दर्जाचे अभियंते घडतील 

प्रतिनिधी / सातारा :

ग्रामीण भागातील गोर-गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टने शेंद्रे येथे अभयसिंहराजे भोसले पॉलिटेक्निक कॉलेज सुरु केले. या कॉलेजचा 10 वा वर्धापनदिन साजरा होत असून गेल्या 10 वर्षांत 3 हजार 880 इंजिनियर या कॉलेजने घडवले असून नेहमीच उच्चतम दर्जाचे अभियंते या कॉलेजमधून निर्माण होतील, असा विश्वास ट्रस्टच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

 एबीआयटी कॉलेजच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त कॉलेजच्यावतीने वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य एस. यू. धुमाळ, उपप्राचार्य एस. एस. भोसले, आर. ए. माने, आर. आर. खंडाळे, आय. टी. आय. चे प्राचार्य व्ही. एच. मोहिते, डी. एस. जाधव, आर. ए. निकम, बी. एस. पाटील आदी शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. समुपदेशक, कुंडलीक पाटील आणि सविता सावंत यांनी ‘आपले आरोग्य’ या विषयावर व्याख्यान सादर केले. 

  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी शिक्षणाची आवड आणि गरज ओळखून 21 ऑगस्ट 2008 रोजी शेंद्रे येथे एबीआयटी कॉलेज सुरु करण्यात आले. या कॉलेजमध्ये मुलींना मोफत तर, मुलांना फीमध्ये 50 टक्के सवलत देवून उच्चतम दर्जाचे शिक्षण दिले जाते. आजअखेर 3880 इंजिनियर या कॉलेजने घडवले आहेत. केवळ शिक्षणच नव्हे तर, सामाजिक भान जोपासत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची आवडही निर्माण करण्याचे काम या कॉलेजमधून होत आहे. दरवर्षी वृक्षोरोपण करुन शेकडो झाडे जगवली जात आहेत. कॉलेजमध्ये सर्वसोयींनीयुक्त सुसज्ज लॅब आणि ग्रंथाय, अद्यावत संगणक कक्ष, आधुनिक मशिनरीने सुसज्ज असलेले वर्कशॉप, वायफाय सुविधा, भव्य क्रिडांगण, अनुभवी एम. ई., एम. टेक शिक्षक वर्ग तसेच सातारा, कराड, उंब्रज, तारळे, कोरेगाव, रहिमतपूर बससेवा अशा नानाविध सुविधा कॉलेजमधून पुरवल्या जातात