|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वेळे-कामथी परिसरात डुक्करांकडुन शेतीचे नुकसान

वेळे-कामथी परिसरात डुक्करांकडुन शेतीचे नुकसान 

प्रतिनिधी /सातारा :

वेळे-कामथी परिसरात घनदाट जंगल असल्याने रानटी डुक्करांकडुन शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. डुक्करांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयबीन, भुईमूग, उढस अशा विविध पिकांचे जनावरांकडून नुकसान होत असल्याने पिके धोक्यात आली आहेत.

 शेतीसाठी, पाईप लाईन, बी-बियाणे, खते अशा विविध कारणांसाठी शेतकऱयांनी कर्जे काढलेली आहेत. पण रानटी प्राण्यांच्याकडून पिके फस्त केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सतत कोसळणाऱया पावसाने इतर पिके कुजू लागली आहेत. तर त्यातच रानटी प्राण्यांचा वावर वाढल्याने त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करणे अवघड झाले आहे. तसेच हिंसक प्राण्यांकडून देखील पाळीव प्राणी फस्त केले जात आहेत. रानटी प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याने याची भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.