|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » 2018-2019 मध्ये आर्थिक विकास दर 7.5 टक्के राहणार : मुडीज

2018-2019 मध्ये आर्थिक विकास दर 7.5 टक्के राहणार : मुडीज 

वृत्तसंस्था  /नवी दिल्ली :

भारताचा आर्थिक विकासाचा दर 2018 -2019 या आर्थिक वर्षांत 7.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज अहवालातून मांडण्यात आला आहे. तेलाच्या वाढत्या किंमती या अर्थव्यवस्थेला चालना देण्याला आव्हान देणारी आहे. परंतु
यातून बाहेर पडण्याची ताकद भारताकडे असल्याचे मुडीजच्या 2018-2019 अहवालातून मांडण्यात आली आहे.

मागील काही महिन्यापासून वीजेच्या किंमतीत वाढ झाली असून यातून तात्पुरते चलनात वाढ होणार असली तरी विकास दर मजबुत झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भाग व औद्योगिक क्षेत्र यामध्ये सुधारणा दिसून आली आहे.

जी 20 यामध्ये समावेश असणाऱया देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबूत स्थिती तयार झाली असून 2018 मध्ये दिसून येणारी अर्थव्यवस्थेमधील विकास दर वाढीचा दर वेगवेगळा राहणार असल्याचे संकेत मांडण्यात आले अहेत. जी 20 सारख्या परिषदा आणि दुसरीकडे अमेरिकेकडून वाढता व्यापार संरक्षण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे विकसनशील अर्थव्यवस्थेची स्थिती थोडी कमजोर राहिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

2018 मध्ये जी 20 या परिषदेत असणाऱया देशाचा आर्थिक विकास दर 3.3 टक्के आणि 2019 मध्ये 3.1 टक्का राहणार असल्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. तर या परिषदेत 2018 -2019 मध्ये असणाऱया बाजारपेठामध्ये  5.1 आर्थिक विकास दर वाढ होणार असून यात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर चालू व पुढील वर्षात 7.5 टक्के राहणार असल्याची नोंदणी करण्यात आली आहे.

 

 

Related posts: