|Monday, November 12, 2018
You are here: Home » उद्योग » रिलायन्स कंपनीची प्रथम स्थानी झेप

रिलायन्स कंपनीची प्रथम स्थानी झेप 

वृत्तसंस्था /मुंबई :

मार्केटमधील रिलायन्स इंडस्ट्रीज 8.5 लाख कोटी रुपयाची  सर्वात जादा किंमत असणारी कंपनी म्हणून नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर्सध्ये वाढ दिसून आली त्याबरोबर बाजारातील सर्वात मोठी कंपनी ठरली. बीएसईच्या शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 129.90 रुपयावर पोहोचली तर एनएसई मधील शेअर्स 1,265.90 वर वधारले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

12 जुलैमध्ये रिलायन्स कंपनी दुसऱयादा 100 अब्ज डॉलर्सची कंपनी झाली होती. मार्केट कॅपमधील रिलायन्सच्या जवळपास आयटी कंपनी टीसीएस आहे.  परंतु मागिल एक महिन्यापासून आरआयएल कंपनीच्या तेजीसह वाढ झाली आहे.

टीसीएस कंपनीची बाजारातील किंमत 7.79 लाख कोटी रुपये आहे. याची तुलना आरआयएलसोबत केल्यास 26 हजार कोटीने कमी असल्याचे नोंद करण्यात आले आहे. 31 जुलै ते 23 ऑगस्ट पर्यत रिलायन्सने टीसीएस कंपनीला चार वेळा पाठीमागे टाकले आहे. तर रिलायन्स हि कंपनी देशातील सर्वांत मोठी म्हणून प्रथ स्थानी क्षेप घेतली आहे.

मुकेश अंबानी यांची संपत्ती 3.39 लाख कोटी रुपयाची झाली आहे. रिलायन्सचे शेअर्सच्या खरेदी विक्रीत तेजीसह वाढ झाली. ब्लुमबर्ग बिलेनियरचा निर्देशांकाच्या बरोबरीत 11 क्रमाकावर पोहोचली आहे. तर बिलेनियर निर्देशांक जॅक 18 व्या क्रमाकावर आहे. तर फेसबुकचे झुकेरबर्ग यांचा सहाव्या क्रमांकावर राहिले आहेत.

 

Related posts: