|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट कोहली पुन्हा नंबर वन!

विराट कोहली पुन्हा नंबर वन! 

वृत्तसंस्था /दुबई :

भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी मानांकनामध्ये पुन्हा अग्रस्थान पटकावले असून त्याने वैयक्तिक सर्वोच्च 937 मानांकन गुण मिळविले आहेत. नॉटिंगहममध्ये झालेल्या तिसऱया कसोटीतील शानदार कामगिरीचा त्याला लाभ झाला आहे. सर्वाधिक मानांकन गुण मिळविणाऱया सर्वकालीन फलंदाजांत त्याने मिळविलेले गुण 11 व्या क्रमांकावर आहेत.

कोहलीने तिसऱया कसोटीत 97 व 103 धावा जमवित भारताला विजय मिळवून देत इंग्लंडची आघाडी कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीने त्याच्या मानांकन गुणांतही वाढ झाली असून त्याची ही सर्वोत्तम रेटिंग गुणांची कमाई आहे. बर्मिंगहममधील पहिल्या कसोटीनंतर त्याने कसोटी मानांकनात पुन्हा अग्रस्थान मिळविले होते. पण दुसऱया कसोटीनंतर त्याची दुसऱया स्थानी घसरण झाली होती. सर्वकालीन सर्वोत्तम गुण मिळविणाऱया चार खेळाडूंचा संच असून त्यांना गाठण्यासाठी विराटला केवळ एका गुणाची गरज आहे. त्याने या मालिकेत आतापर्यंत 440 धावा जमविल्या असून या संचाला तो मागे टाकण्याची शक्मयता आहे.

या यादीतील टॉप टेनमध्ये सर डॉन ब्रॅडमन (961), स्टीव्हन स्मिथ (947), लेन हटन (945), जॅक हॉब्ज (942), रिकी पाँटिंग (942), पीटर मे (941), गॅरी सोबर्स, क्लाईड वॉलकॉट, व्हिवियन रिचर्ड्स, कुमार संगकारा (प्रत्येकी 938 गुण) यांचा समावेश असून कोहली 937 गुणांसह या यादीत 11 वे स्थान मिळवले आहे. चेतेश्वर पुजारा हा भारताचा दुसरा सर्वोच्च मानांकित फलंदाज असून तो सहाव्या स्थानावर आहे तर अजिंक्मय रहाणे चार स्थानांची प्रगती करीत 19 व्या स्थानावर पोहोचला आहे. शिखर धवननेही चार स्थानांची प्रगती केली असून तो 22 व अष्टपैलू हार्दिक पंडय़ा 8 स्थानांची प्रगती करीत 51 व्या स्थानावर पोहोचला आहे. तिसऱया कसोटीतील उपयुक्त योगदानामुळे त्यांना बढत मिळाली आहे.

हार्दिकने गोलंदाजांच्या यादीतही 51 व्या स्थानावर पोहोचला असून त्याने 23 स्थानांची प्रगती केली आहे. आजवरचे त्याचे हे सर्वोच्च स्थान असून तिसऱया कसोटीत त्याने पहिल्या डावात 5 बळी मिळविले होते. दुसऱया डावात पाच बळी घेतलेल्या बुमराहनेही 8 स्थानांची प्रगती करीत 37 वे स्थान मिळविले आहे. त्याचेही हे आजवरचे सर्वोत्तम मानांकन आहे.