|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा वाजला बिगूल

61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा वाजला बिगूल 

प्रतिनिधी /सोलापूर :

सोलापूर जिह्यातील ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱया तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायातीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांनी गुरूवारी जाहीर केला. थेट सरपंचसाठी जनतेतून निवडून देणाऱया निवडणुकीसाठी जिह्यातील 10 तालुक्यांचा समावेश असून 61 ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहे. दरम्यान, सोमवार 27 ऑगस्ट रोजी तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार असून 5 सप्टेंबर पासून नामनिर्देशन पत्र देण्यास प्रारंभ होणार आहे.

  थेट नारिकातून सरपंचांना निवडून द्यायचे असून नुकतेच त्याचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये करमाळा-2, माढा-2, बार्शी-3, पंढरपूर-4, मोहोळ-4, माळशिरस-9, दक्षिण सोलापूर-6, मंगळवेढा-12, सांगोला-6, अक्कलकोट-12 या दहा तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

 निवडणूक होणारी 64 गावेप्रमाणे- दक्षिण सोलापूर- तिल्लेहाळ, ऊळे, ऊळेवाडी, औज, आलेगाव, कुंडल, मंगळवेढा– हुन्नुर, कागष्ट, खवे, येळगी, लक्ष्मीदहिवडी, मानेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, डिकसळ, देगाव, रेवेवाडी, जित्ती. अक्कलकोट-  धारसंग, केगाव बु, म्हैसलगे, रामपूर/इटगे, शावळ, तळेवाड, कुडल, केंगाव खु, कलकर्जाळ, जकापुर, कंटेहळ्ळी, घुंगरेगाव, बार्शी- घारी, लाडोळे, सुर्डी, मोहोळ– वडदेगाव, गोटेवाडी, कोन्हेरी, लमाणतांडा, पंढरपूर– जळोली, पांढरेवाडी, गार्डी, जाधववाडी. करमाळा– लव्हे, वरकुटे या गावांचा समावेश आहे. माढा– रोपळे, पिंपळणेर. माळशिरस- डोंबाळवाडी कु, झंजेवाडी खु, पिलीव, कदमवाडी, सुळेवाडी, जाधववाडी, हनुमानवाडी, झिंजेवस्ती,  भांबुडी. सांगोला– वाढेगाव, राजापूर, सोनंद, गळवेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी आदी तालुक्यांचा समावेश आहे.