|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपासाठी आणखी साडेपंचवीस कोटी

मनपासाठी आणखी साडेपंचवीस कोटी 

प्रतिनिधी /सांगली :

मनपाक्षेत्रातील रस्ते, गटारी, डेनेज यासह पायाभूत सुविधा देण्यासाठी शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून मनपाला 25 कोटी 61 लाखाचा निधी दिला आहे. दरम्यान, चार दिवसापूर्वी शंभर कोटी निधी देण्यास शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून यामुळे आठवडय़ात डबल धमाका दिला आहे. 

मनपाक्षेत्रातील रस्ते, गटारी, डेनेज, पाणी आदी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने महापालिकेस 14 व्या वित्त आयोगातून 25 कोटी 61 लाख इतका निधी मंजूर केला असून याबाबतचा आदेश मनपाला प्राप्त झाला आहे. या निधीतील 12 कोटी 70 लाख मिरज अमृत योजनेसाठी तर 12 कोटी 90 लाख निधी मनपाच्या पायाभूत सोयीसाठी खर्च करण्यात येणार आहेत. या निधीमुळे मनपा क्षेत्रातील कामे मार्गी लागणार आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या विविध प्रस्तावित प्रकल्पासाठी 100 कोटीचा निधी देण्यास शासनाने चार दिवसापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत असलेल्या प्रकल्पात मनपाक्षेत्रात सुरु असलेल्या योजनांसाठी हा निधी वापरता येणार आहे. मनपावर भाजपाचा झेंडा फडकल्यानंतर सत्तेची सूत्रे हातात घेण्यापूर्वीच भाजपाप्रणीत शासनाने मनपाला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन सांगलीकरांना मोठा दिलासा दिला आहे.

Related posts: