|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावातील दोघे एटीएसच्या ताब्यात

तासगावातील दोघे एटीएसच्या ताब्यात 

प्रतिनिधी /सांगली :

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या तपासाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएसच्या पथकांनी देशभर छापासत्र सुरू केले आहे. गुरूवारी एटीएसच्या पथकांनी सांगली जिल्हय़ात छापे टाकले. तासगावमध्ये एका संस्थेच्या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले असल्याचे समजते. याची दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. पण अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या या कारवाईबाबत अधिकृत कोणतीही माहिती समजू शकली नाही.

 दरम्यान, पोलिसांनी जिल्हय़ातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेच्या बाबतती दक्षता घेतली असुन गुरूवारी काही नेत्यांच्या पोलिसांनी भेटी घेतल्या. या नेत्यांच्या सुरक्षेसंबंधी दक्ष राहण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.  

 नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या आरोपींच्या चौकशीदरम्यान डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचे महत्वाचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागले आहेत. पुरोगामी विचारवंतांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मुख्य तपास यंत्रणा असलेली एटीएस आणि राज्यभरातील पोलिसांनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवले आहे. यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सांगली जिल्हय़ातील काही साधकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगली, मिरजेसह जिल्हय़ातील काही जणांना एटीएस केव्हाही चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते याची चर्चा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणामध्ये अनेक दिवसांपासून होती. तीस ते पस्तीस जणांची यादीच तयार करण्यात आली असून संबंधितावर वॉच ठेवण्यात आला आहे.

Related posts: