|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भोम येथील सातेरी मंदिरात चोरी

भोम येथील सातेरी मंदिरात चोरी 

वार्ताहर /माशेल :

भोम येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले श्री सातेरी देवीचे मंदिर फोडून चोरटय़ांनी अंदाजे रु. 2 लाखांचा ऐवज पळविला. काल गुरुवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

 मंदिराचा मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरटय़ांनी आंतमध्ये प्रवेश केला व त्यानंतर गर्भकुडीच्या दरवाजाची कडी तोडली. देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा मुकुट व फंडपेटीतील अंदाजे रु. 8 हजारांची रोख रक्कम चोरटय़ांच्या हाती लागली. देवीच्या अंगावरील इतर दागिने ठेवण्याचे कपाट फोडण्याचा प्रयत्न प्रयत्न असफल ठरला. गुरुवारी सकाळी 6.30 वा. देवस्थानच्या झाडूवाल्याने मंदिर उघडले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पुजारी राजन घाटे यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद भोमकर यांना यासंबंधी माहिती दिल्यानंतर फोंडा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

Related posts: