|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला अकादमी अनुवादित लेखकांचा सन्मान करणार

कला अकादमी अनुवादित लेखकांचा सन्मान करणार 

प्रतिनिधी /पणजी :

गोमंतकीयांचे कलेकडे वेगळे नाते आहे. कला गोमंतकीयांचा छंद, व्यासन तर आहेच पण त्याचबरोबर श्वासही आहे. गोव्यात एतिहासिक, सामाजिक व संगीत नाटय़प्रयोग होत असतात. आज कोकणीतून मराठीत तर मराठीतून कोकणीत अनुवादित करुन नाटक सादर केले जाते. हा अनुवादाचा भार अनुवादक आपल्या खांद्यावर झेलतो व योग्य ते प्रेक्षकांना देतो. अशा अनुवादकांना बक्षिस देण्याची गरज आहे व ती गरज कला अकादमी यावर्षी अनुवादीत लेखकांचा सन्मान करून करणार आहे तसेच संगीत नाटय़महोत्सवही कला आकदमी स्वःखर्चाने करणार असल्याची घोषणा कला व संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी केली.

कला अकादमी गोवातर्फे गोमंतकाचे आद्य नाटककार व संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘गोमंत रंगभूमी दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी गोमंतकीय कलाकारांना कृष्णभट्ट बांदकर व रंगसन्मान पुरस्कार देण्यात आले. या समारंभासाठी महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेले ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर, खास निमंत्रित कला आणि संस्कृती सचिव दौलतराव हवालदार, कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर, कला अकादमीचे सदस्य राजीव शिंदे आण रविंद्र आमोणकर यांची उपस्थिती होती. सर्व सत्कारमुर्तींना मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, प्रत्येक गोमंतकीय आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे पण सर्वांची पाऊले ही कलेकडे वळतात. कलेची व्याख्या करून कलेला शब्दात मांडणे कठीण आहे. ज्या कलाकारांचा सन्मान झाला ते सर्व कलाकार आपापल्या कामात व्यस्त होते पण तरीही त्यांनी कलेकडे पाठ फ्ढिरविली नाही. यश संपादन करण्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. आजच्या युवा पिढीनी अशा कलाकारांना आपल्या नजरेसमोर ठेऊन घडावे अशी विनंतीही मंत्री गावडे यांनी केली.