|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » आईच्या अस्थी कुरियरने पाठवा, पोटच्या मुलीची अजब मागणी

आईच्या अस्थी कुरियरने पाठवा, पोटच्या मुलीची अजब मागणी 

ऑनलाईन टीम / पालघर :

 निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्कारला येऊ न शकलेल्या मुलीने चक्क अस्थी कलश कुरियर करण्याची मागणी गावकऱयांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

पालघर जिह्यातील मनोर येथे निरीबाई धीरज पटेल या 65 वर्षीय पारशी महिलेची वृद्धपकाळाने निधन झाले.पती धीरज पटेल यांचे वय झाल्याने त्यांना चालण्याचीही ताकद नाही.तर एकुलती एक मुलगी लग्न करून गुजरातमधील अहमदाबादमध्ये असल्याने त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे असा प्रश्न गावकऱयांसमोर उभा राहिला असतना ग्रामस्थांनी ही बाब मुलीला कॉल करून सांगितली पण मला यायला जमणार नाही, असे सांगत तिने व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगने आईच्या पार्थिवाचे दर्शन द्या आणि अस्थीही कुरिअर करा अशी अजब मागणी केली आहे. ही अजब मागणी ऐकून गावकरीही थक्क झाले.

 

Related posts: