|Thursday, July 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » स्त्रीप्रधान चित्रपटासाठी अभिनेत्रींना जादा वेतन मिळावे ;तेजस्विनी पंडितची भूमिका

स्त्रीप्रधान चित्रपटासाठी अभिनेत्रींना जादा वेतन मिळावे ;तेजस्विनी पंडितची भूमिका 

ऑनलाईन टीम / पुणे :

चित्रपटासाठी अभिनेत्रीलादेखील अभिनेत्यांइतके मानधन मिळावे, अशी चर्चा नेहमीच होत असते. त्यात चुकीचे काही नाही. पण अशी मागणी करताना अभिनेत्रींनी आपण चित्रपटासाठी किती बिझनेस आणू शकतो, याचाही विचार केला पाहिजे. स्त्रीप्रधान चित्रपट असेल, तर अभिनेत्रीला नक्कीच जास्त पैसे मिळायला हरकत नाही, अशा भावना अभिनेत्री तेजस्वी पंडीत हिने गुरुवारी येथे व्यक्त केल्या.

श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा या उपक्रमांतर्गत तेजस्विनीने पत्रकारांशी संवाद साधला. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.

तेजस्विनी म्हणाली, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकाराला पैशांबाबत नेहमीच पिळवणूक केली जाते. त्यांना कमी मानधन दिले जाते. विशेषतः अभिनेत्रींना याबाबतीत जास्त दुर्लक्षित केले जाते. हे चित्रपटसृष्तीतील दुर्दैवी वास्तव आहे. पण म्हणून अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन मिळावे, अशी मागणी चुकीची आहे. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाप्रमाणे योग्य वेतन मिळाले पाहिजे. वेब सीरीजमुळे माध्यम क्षेत्राला एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होत आहे. मात्र, अनेकवेळा या क्षेत्रात नैराश्याचा सामना करावा लागतो, याकडेही तिने लक्ष वेधले.

माझी आई ज्योती चांदोरकर ही स्वतः कलाकार असल्याने या क्षेत्राबाबतचे कौशल्य तिच्याकडूनच शिकले. अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करायची करण्यासाठी मेहनत घेतली. यश मिळविले. आता ते टिकविण्यासाठी धडपड चालू आहे, असे तिने सांगितले.