|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा

वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा 

रिफायनरी होऊ देणार नाही- रवींद्र वायकर यांचा पुनरूच्चार

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोटय़वधी रूपये खर्च करून उभारण्या येणाऱया नाणार येथील महाकाय रिफायनरीच्या विरोधात स्थनिक जनता आंदोलन करत आहे. त्यांचे नेतृत्व अशोक वालम करत आहेत़ वालम यांच्या प्रकल्प होऊ न देण्याच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आह़े असे प्रतिपादन पालकमंत्री रवेंद्र वायकर यांनी केल़े

ते रत्नागिरी येथील ‘तरूण भारत’ कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी आले होत़े त्यावेळी ते म्हणाले की विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्यावेळी नाणार परिसरातील लोकांनी आंदोलन केले होत़े महाप्रदूषणकारी प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याच्या विरोधात लोकांच्या भावना तीव्र होत्य़ा या भावना आंदोलनातून व्यक्त झाल्य़ा

ते पुढे म्हणाले या आंदोलकांना ते नागपूर येथे भेटल़े त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल़ा अशोक वालम यांनी हे आंदोलन हाती घेतले आह़े ते लोकांच्या भावना योग्यप्रकारे मांडत आहेत़ ते जनतेचे आंदोलन करत आहेत़ शिवसेना जनतेबरोबर असल्याने त्यांच्या या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा राहील़

अशोक वालम हे नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनातील लढवय्ये नेते म्हणून प्रसिद्ध आहेत़ त्यांनी मुंबईत मूळ नाणार परिसरातील चाकरमान्यांचे रिफायनरी विरोधी चांगले संघटन उभारले आह़े त्याला गावकऱयांना जोडून घेण्यात आले आह़े वालम यांच्या आंदोलनाला पालकमंत्री वायकर यांनी पाठिंबा दिला आह़े पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहर्याचा निर्णय केव्हाच जाहिर केला आहे. त्यानुसार प्रत्येक शिवसैनिक रिफायनरी हद्दपार होईपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या भेटीदरम्यान त्यांनी कोकणातील विविध समस्यांसंदर्भात सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. अनेक बाबतीत कोकणासाठी वेगळे निकष तयार करण्याची गरज असून त्यासाठी ते अभ्यास करत असल्याचेही ते म्हणाले.

Related posts: