|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » उद्योग » वित्तीय तूट नियंत्रणासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद : राजन

वित्तीय तूट नियंत्रणासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद : राजन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वित्तीय तूट मर्यादित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱया प्रयत्नांचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भरभरून कौतुक केले आहे. लवकरच सार्वत्रिक निवडणूक होणार असूनही लहान उद्योगांवर भर आणि चालू खाते तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताने काही प्रमाणात वित्तीय तूट कमी केली आहे, तर आता चालू खाते तुटीवर लक्ष द्यावे, असे राजन यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हटले.

काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी सरकार चालू वर्षातील वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठेल असे म्हटले होते. मात्र कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने चालू खाते तूट काही प्रमाणात वाढेल असे सांगितले होते. नोमुराच्या मते चालू आर्थिक वर्षात चालू खाते तूट वाढत जीडीपीच्या 2.8 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मोदी सरकारने 2013-14 मध्ये 4.5 टक्क्यांवर असणारी वित्तीय तूट 2017-18 मध्ये 3.5 टक्क्यांपर्यंत आणली आहे. चालू वर्षासाठी हे लक्ष्य 3.2 टक्क्यांचे आहे.

रुपयाच्या अवमूल्यनाने चिंता करण्याचे कारण नाही. डॉलरच्या तुलनेत भीती वाढेल अशा पातळीपर्यंत रुपया अजून पोहोचला नाही. डॉलर मजबूत होत असल्याने रुपया कमजोर होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीच्या तुलनेत भारतात महागाईचे प्रमाण जास्त आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली