|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » रुची सोयाच्या विक्रीस बँकांची मंजुरी

रुची सोयाच्या विक्रीस बँकांची मंजुरी 

अदानी विल्मर 6 हजार कोटी रुपयांना खरेदी करणार   पतंजली बाहेर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी खाद्यतेल उत्पादक कंपनी ‘रुची सोया’ची फॉर्च्युन ब्रॅन्डची मालकी असणाऱया अदानी विल्मर कंपनीला विक्री करण्यास बँकांकडून मंजुरी देण्यात आली. अब्जाधीश गौतम अदानी यांची कंपनी इंदोरमध्ये मुख्यालय असणाऱया रुची सोयाची खरेदी करेल. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने या कंपनीच्या खरेदीसाठी 5,700 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र 96 टक्के कर्जदात्यांनी अदानी विल्मरला पसंती दिली.

पहिल्या लिलावामध्ये पतंजलीने 4,300 कोटी आणि अदानी विल्मरने 3,300 कोटी रुपयांची बोली लावली होती. 16 जून रोजी संपलेल्या दुसऱया लिलावादरम्यान विल्मरकडून सर्वाधिक रक्कम आल्याचे समोर आले. विल्मरकडून मिळणाऱया एकूण रकमेपैकी 53 टक्के पैसे बँकांना मिळणार आहेत. खरेदीला अंतिम रुप देण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे पाठविण्यात येणार आहे. दिवाळखोरी प्रक्रियेचा सामना करत असणाऱया रुची सोयाकडे 12 हजार कोटींचे कर्ज आहे. एसबीआयचा  हिस्सा 1,822 कोटी आहे.

 अदानी विल्मरने सर्वाधिक बोली लावल्याचे समजल्यानंतर पतंजलीने लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अदानी समूहाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.