|Thursday, November 15, 2018
You are here: Home » उद्योग » आपत्कालीन वेळप्रसंगी मारुती सुझुकीची ‘बाईक’ सेवा

आपत्कालीन वेळप्रसंगी मारुती सुझुकीची ‘बाईक’ सेवा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मारुती सुझुकीने कार चालकांसाठी मोटारसायकल आधारित रस्त्यांवर उपयोगात पडणारी सेवा सुरू केली. देशात कोणत्याही कार कंपनीकडून अशी पहिल्यांदाच सेवा सुरू करण्यात आली. रस्त्यांवर कार बंद पडल्यास अशावेळी मदत करण्यात येणार आहे. 350 सुझुकी बाईकच्या साहाय्याने 251 शहरांत सेवा पुरविण्यात येत आहे. 2020 पर्यंत ही सेवा 500 शहरांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे.

देशात अनेक ठिकाणी वर्दळ जास्त असल्याने अशावेळी कार आधारित सेवेला विलंब लागतो. अशावेळी ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाही. यावर उपाय म्हणून तत्काळ सेवा देण्यासाठी आणि आवश्यक उपकरणांच्या साहाय्याने दुचाकीच्या मदतीने सेवा देण्यात येणार आहे, असे कंपनीचे सीईओ केनिची आयुकावा यांनी म्हटले. या सेवेसाठी ठिकाणानुसार 420 ते 575 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Related posts: