|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » 560 अब्ज रुपयांची वेदान्ताकडून गुंतवणूक

560 अब्ज रुपयांची वेदान्ताकडून गुंतवणूक 

नवी दिल्ली

 धातू आणि खाण क्षेत्रातील प्रमुख कंपनी वेदान्ता पुढील तीन वर्षांत देशात 560 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे. देशातील विविध प्रकल्प, व्यवसायांत ही गुंतवणूक असणार आहे. देशांतर्गत तेल उत्पादनात कंपनीचा हिस्सा 27 टक्के असून तो 50 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी 3 ते 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल असे कंपनीचे प्रमुख नवीन अगरवाल यांनी म्हटले. चालू वर्षात कंपनीने ऍल्युमिनियम, चांदी, जस्त आणि झिंकचे विक्रमी उत्पादन केले आहे. या व्यवसायांतही एकूण 3 ते 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे.