|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्नाटकातील युवक चंद्रभागेत गेला वाहून…

कर्नाटकातील युवक चंद्रभागेत गेला वाहून… 

पंढरपूर / प्रतिनिधी

येथील चंद्रभागा नदीमध्ये कर्नाटकातील बसवकल्याणाचा 18 वर्षीय लखन टोंपे वाहून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलीस शोधकार्य करीत आहेत. लखन हा त्यांच्या कुटुंबीयासमवेत पंढरीत देवदर्शनासाठी आलेला होता.

याबाबत अधिक माहीती अशी की, लखन त्यांच्या कुटुंबीयासमवेत चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेला. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी वाढल्याने चंद्रभागेतील  पाण्याचा साठा वाढला आहे. अशामध्येच येथील पुंडलिक मंदिराजवळ स्नान करीत असताना अचानक लखने टोंपेला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन तो चंद्रभागेमध्ये वाहून गेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

   लखन वाहून जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना लक्षात आल्यावर. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. मात्र तोपर्यत लखन वाहून गेला होता.  त्यानंतर पोलीस प्रशासन, पालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक कोळी बांधवांनी त्यांचे चंद्रभागा नदीमध्ये शोधकार्य सुरू केले. येथील विष्णपुद बंधारा तसेच पुढील काही बंधा-यावर देखिल मोठया प्रमाणवर शोधकर्य हाती घेण्यात आलेले आहे. सदरचा अठरा वर्षीय युवक पाण्यामध्ये वाहून गेल्याने चंद्रभागेमधील भाविकांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलेला आहे. यापूर्वी देखील अनेक भाविक वाहून गेल्याचा इतिहास आहे.