|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सैनिकांची घरपट्टी माफ करा – आ.परिचारक

सैनिकांची घरपट्टी माफ करा – आ.परिचारक 

पंढरपूर/ वार्ताहर

देशाचे संरक्षण दलातील शौर्यपदक धारण सैनिक, सैनिकांचे वीरपत्नी यांना स्थानिक क्षेत्रातील निवास इमारती-घरावरील घरपट्टी पूर्णपणे माफ करणेबाबतच्या प्रस्तावास पंढरपूर नगरपरिषदेने येणाऱया सर्वसाधारण सभेमध्ये त्वरीत निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी सूचना आ. प्रशांत परिचारक यांनी पालिकेकडे केली.

शासनाने संरक्षण दलातील शौर्यपदक धारण सैनिक, आजी-माजी सैनिकांचे वीरपत्नी, आजी आणि माजी सैनिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेञातील निवासी इमारती, घर यावरील करामध्ये सवलत लागू करणेबाबत शासकीय परिपञक प्रसिध्द केले आहे. या शासकीय धोरणानुसार पंढरपूर नगरपरिषदेने सैनिकांच्या मालमत्ता करामध्ये संपूर्ण सुट लागु करणेबाबत आजी-माजी सैनिकांनी आ. परिचारक यांच्याशी समक्ष चर्चा करुन सहयांसह लेखी निवेदन दिले आहे.

त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेने येणाऱया सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावावर मंजुरी देवून सैनिकांच्या मालमत्ता करमुक्त कराव्यात अशी सूचना आमदार प्रशांत परिचारक यांनी केली. तसेच नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, भाजपा पक्षनेते अनिल अभंगराव व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे पक्षनेते गुरुदास अभ्यंकर आदी नगरसेवकांनी यामध्ये विशेष लक्ष घालुन कार्यवाही करुन लवकरात लवकर निर्णय घेणेबाबत सुचित केले.

माजी सैनिक कृष्णराज करंडे, मुबारक कोरक, काशिनाथ रणदिवे, दिवाकर पाटील, शहाजी साळुंखे, बिभीषण गाजरे, एम. बी. गायकवाड, सुदाम चंदनशिवे, महेशचंद्र कुलकर्णी, बाजीराव करंडे, हरिभाऊ भोसले, नारायण शिंदे, सौ. पार्वती टेके, श्रीमती वत्सला माळी, बबन वास्ते, जगन्नाथ गोरे, सौ. नकाते, हरी कांबळे, विलास यादव, मधुकर पिसे, विष्णु यादव, चंद्रकांत गावडे आदी आजी माजी सैनिकांनी आ. परिचारक यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याचा लाभ पंढरपूर परिसरातील अनेक आजी माजी सैनिकांचे कुटुंबियांना होणार आहे.

Related posts: