|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार

आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार 

सोलापूर / प्रतिनिधी

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यघटनेत धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद असून देखील राज्य सरकार धनगर समाजावर अन्याय करीत असल्याचे भावना यावेळी वक्त्यांनी केली.

केंद्र सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱया यादीत 36 क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश असून धनगर ऐवजी धनगड अशी चूक झाल्यामुळे राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचीत रहावे लागत असून राज्यात धनगड नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे राज्य सरकारने धनगड ऐवजी धनगर अशी चूक दुरूस्त करुन राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचे राज्य सरकारने अनेकवेळा आश्वासन दिले असून त्यांची अंमलबजावणी करावी. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांना आर्थीक मदत करावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित आंदोलनाची सुरूवात चार पुतळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दुपारी 12 च्या सुमारास मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पार्क चौक, सिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर प्रशाला यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत मान्यवरांनी आरक्षण मिळावे, अशी मागणी केली.

या प्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष नगरसेवक चेतन नरोटे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, मोहोळ पंचायत समितीचे सभापती समता गावडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, माजी महापौर अरूणा वाकसे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, संतोष वाकसे, अर्जून सलगर आदी उपस्थित होते.

Related posts: