|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » थकीतदारांवर कारवाईला मूहुर्त मिळेना

थकीतदारांवर कारवाईला मूहुर्त मिळेना 

पाणी बिल ग्राहकांना दिली जातेये सूट, थकबाकीच्या रक्कमेचा वाढतोय भारच भार

प्रतिनिधी/ सातारा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱया पाणी पुरवठा बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे. अभिंयता गायकवाड यांनी पदभार स्विकारताच वसुली पथके रवाना करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र पथके गायब झाली असून अजून कारवाईला मुर्हूत मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कर्जाचा भार वाढत जाणार असल्याची चर्चा होत आहे.

शहराला तसेच इतर भागाना पाणी पुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता कर्जाचा बोजा सोबत घेवून फिरणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने लोकांना हंडे घेवून ऑफिसमध्ये जाण्याची वेळ सारखीच येत असते. मात्र प्राधिकरणाकडून नुसतेच पाणी पुरवठा सुरूळीत करण्याकडे भर दिला जात आहे. ज्या ग्राहकांनी हे पाणी गेल्या अनेक वर्षापासून वापरले आहे. त्यांनी यांची बिले भरली नाहीत. आणि प्राधिकरण कोणतीच कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. नुकतेच अभिंयता गायकवाड यांनी पदभार सांभाळताच वसुली पथके तयार करून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान ही कारवाई करायला प्राधिकरणाला मुर्हूत मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे अभिंयता गायकवाड तारीख पे तारीख देत ही कारवाई पुढे ढकलत आहे. आणि थकीत बिलाच्या कर्जाचा भार प्राधिकरणावर वाढत जात आहे.

त्यामुळे शहराला तसेच इतर भागाना पाणी पुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नक्की कोणाची वाट पाहते आहे हेच शहरातील व परिसरातील नागरिकांना समजेना. त्यामुळे नव्याने पदभार स्विकारलेल्या अभिंयता गायकवाड यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चाना उधान आले आहे.