|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाबळेश्वरमध्ये चवेणीचा फुलोत्सव झाला सुरु

महाबळेश्वरमध्ये चवेणीचा फुलोत्सव झाला सुरु 

साधारणपणे महिनाभर या फुलांचा बहर, संपूर्ण परिसरात काहीसा सुखद असा सुवास

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरमध्ये सध्या चवेणीच्या (चवर जातीच्या) फुलांचा फुलोत्सव सुरु झाला असून सारे पठारच या फुलांनी सजलेली शालच पांघरून बसल्याचे भासत आहे. येथील पावसाळी हंगामात सतत 1-2 महिने पडणाऱया पावसानंतर पावसाळी वातावरणातच  प्रतीवर्षी चवेणीची ही वैशिठय़पूर्ण फुले मोठय़ाप्रमाणात फुलल्याचे दिसतात. साधारणपणे महिनाभर याचा बहर असतो.

कर्दळीच्या जातीची हि वनस्पती असून तिला ‘चवेणी’ नावाने ओळखतात. काही भागात तिला ‘चवर’ म्हणूनही संबोधितात. या  वनस्पतीचे वनस्पतीशास्त्रातील  नाव ‘हिटचेनिया कौलिना’ असे आहे तर तिची वनस्पती शास्त्रातील जात ‘झिंगीबेरासीई’ आहे. ‘आरारूट’ असेही काहीजण या वनस्पतीला म्हणतात. हे नाव त्याच्या कंदावरून (मुळावरुन) पडले असावे, असे स्थानिक जाणकार सांगतात.

सुमारे दोन ते तीन फुट उंचीची ही वनस्पती असून तिची पाने कर्दळीच्या पानासारखी लांब, मोठी व हिरवी असतात. पानांच्या मध्यातून लांब, उंच नळी सारखे खोड असून त्यावर कणीसासारखा झुपकेदार भाग असून त्यावर पांढरी शुभ्र झुपकेदार फुले असतात. कणीसाच्या पाकळ्या काही वनस्पतीमध्ये हिरव्या रंगाच्या तर काही ठिकाणी गुलाबी छटा असलेल्या आढळतात. पांढऱया रंगाबरोबरच पांढरट पिवळसर छटा असलेली  फुले काही ठिकाणी पहावयास मिळतात. अनेक फुलांना मुख्य फुलाबरोबर चोहो बाजूने पांढरी  छोटी-छोटी फुले लटकलेली ही दिसतात. फुले अत्यंत आकर्षक, सुंदर व मनमोहक दिसतात.त्याला मंद असा वास ही असतो. ज्यावेळी या फुलांचा बहर असतो,  संपूर्ण परिसरात काहीसा सुखद असा वेगळाच वास दरवळत असतो.

महाबळेश्वरचा प्रसिद्ध केटस ठिकाणावर पठार ते अवकाळी, भोसेखिंड, भिलारचे पठार हा सुमारे चार किलो मीटरचा पट्टा प्रसिद्ध आहे. अनेक जुन्या लेखकांच्या ‘महाबळेश्वर मार्गदर्शिका’  मध्ये त्याचा असा उल्लेख असल्याचे पहावयास मिळते. विविध पुजेच्या सजावटीसाठी चवेणीचे खुंट व त्याची झुपकेदार पांढरी फुले कर्दळीच्या ऐवजी येथील स्थानिक लोक वापरताना दि

Related posts: