|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्या

विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्या 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा विद्यापिठामध्ये आज विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहे पण शिक्षण खाते  त्याकडे दुलर्क्ष करत आहे. प्रत्येक वर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये गोवा विद्यापिठाचा निवडणूका होत असतात पण यावर्षी जाणून बुजून उशीर केला जाता आहे. विद्यापिठाने 15 दिवसांच्या आत निवडणूका जाहीर कराव्या अन्यथा शिवसेनाची ‘स्टुडंट व्हींग’ ही युवा संघटना विद्यापिठावर मोर्चा नेणार आहे, असे शिवसेना युवा संघटनेचे अध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सांगितले.

 गोवा विद्यापिठामध्ये असलेली डीएसडब्लू सेवा अनेक दिवसांपासून बंद आहे. या नंबरवर फोन केल्यावर लागत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडता येत नाही. विद्यार्थ्याना समस्या सोडविण्यासाठी  ही सेवा सुरु केली होती ती बंद आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणीही यावळी शिवसेना युवा संघटनेतर्फे करण्यात आली.

 शिवसेनामध्ये मोठय़ा प्रमाणात आता युवक सहभागी होत असून सर्वासाठी पक्ष खुला आहे. विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. यावेळी अक्षता नाईक हीने शिवसेना युवा संघटनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना युवा संघटनेच्या सचिव मंथन रंकाळे, नेहारिका कामत, संकेत कुडतरकर व आश्विनी शंटय़े उपस्थित होते.